बातम्या

अणुस्कुरा – ओणी मार्गावर अपघात, महिलेचा जागीच मृत्यू !

राजापूर – (प्रमोद तरळ)
उत्तरप्रदेशहून पुण्याला एका विशेष कार्यक्रमाला उपस्थित राहिलेल्या आणि पुण्यावरून गोव्याला फिरायला जाणाऱ्या चौरसिया या कुटुंबियांच्या गाडीला अणूस्कुरा ओणी मार्गांवरील तालुक्यातील येळवण बागवे या ठिकाणी अपघात झाला. या अपघातात एका महिलेचा जागीच मृत्यू झाला आहे. शुक्रवार सकाळी साडेसात वाजण्याच्या दरम्यान हा अपघात झाला.
याप्रकरणी मिळालेल्या माहितीनुसार उत्तर प्रदेश येथील चौरसिया कुटुंब काही दिवसापूर्वी एका कार्यक्रमाला उत्तरप्रदेश हून पुण्याला आले होते. त्या ठिकाणचा कार्यक्रम आटोपून गोव्याला फिरायला जाऊया असं ठरवून ते पुण्यावरून ओणी विटा महामार्गांने अणुस्कुरा पाचल ओणी असा प्रवास करीत होते. या दरम्यान ते सकाळी येळवण बागवे येथे आले असता त्यांच्या टाटा हॅरियर गाडी क्रमांक UP 53DM8090 या गाडीला अपघात झाला.
चालकाचे गाडीवरील नियंत्रण सुटल्याने गाडी रस्ता सोडून रस्त्यालगतच्या जुनाट झाडाला आदळली. गाडीत एकूण पाच प्रवाशी होते यापैकी राजरानी चौरसिया वय (६८) यांचा जागीच मृत्यू झाला. सदरची गाडी त्यांचा मोठा मुलगा शक्ती राजाराम चौरासिया वय वर्ष २६ राहणार पुणे हे चालवत होते. ते किरकोळ जखमी झाले आहेत,तर गाडीत संजयकुमार चौरासिया वय वर्ष ४७ हे जखमी झाले असून सौ.सरिता संजय कुमार चौरासिया वय वर्ष ४२ किरकोळ जखमी तर एक चार वर्षाची लहान मुलगी किमाया चौरासिया होती.
तर त्यांच्या सोबत अजून एक चार चाकी वाहन त्यांचीच दुसरी फॅमिली त्यात एकूण पाच प्रवाशी प्रवास करीत होते. त्यात मयत राजरानी चौरासिया यांचा दुसरा छोटा मुलगा तसेच मुलगी व मुलीची फॅमिली असे एकूण पाच प्रवासी प्रवास करीत होते. त्यांना कोणत्याही प्रकारची दुखापत झाली नसून ते सर्व सुखरूप आहेत.
सदरच्या घटनेची खबर रायपाटण पोलीस स्टेशन चे पो. कॉ. निलेश कात्रे, व पो. कॉ. स्वप्नील घाडगे,पो. कॉ.भिम कोळी तसेच दक्षता कमिटी राजापूर च्या धनश्री मोरे यांना कळताच त्यांनी तात्काळ घटनास्थळी पोचून मयत महिलेला ग्रामीण रुग्णालय रायपाटण येथे शवविच्छेदन साठी आणले. राजापूर पोलीस निरीक्षक राजाराम चव्हाण यांनी ग्रामीण रुग्णालय येथे येऊन मयत महिलेच्या कुटुंबाची चौकशी करून याबाबत चा पुढील तपास राजापूर चे पोलीस उपनिरीक्षक सुधीर उबाळे आणि त्यांची टीम करीत आहे.

What's your reaction?

Related Posts

1 of 291

Leave A Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

error: Content is protected !!