राजापूर – (प्रमोद तरळ) तालुक्यातील मौजे कळसवली शेडेकर वाडी येथील सार्वजनिक पाण्याची तळी (डुरा) याची डागडुजी (दुरुस्ती) करुन तेथील श्री ब्राम्हणदेव मंदिराचा जीर्णोद्धार व सभामंडपाचे बाधकाम वाडीतील ग्रामस्थांच्या वर्गणी, देणगी व ग्रामस्थांच्या श्रमदानातून करण्यात आले सदर मंदिराचे काम फेब्रुवारी ते १८ मार्च २०२४ दरम्यान होऊन मंदिराचा जिर्णोद्धार
१९ मार्च २०२४ रोजी मोठ्या थाटामाटात संपन्न झाला
दि. २७ मार्च २०२४ रोजी स.१० वा. श्री कालिकादेवी ग्रामदेवतेच्या पालखीचे मोठ्या मिरवणुकीने तेथे आगमण झाले. त्यानंतर श्री सत्यनारायण महापूजा, दु. महाप्रसाद झाला. सायं शेडेकर वाडीतील महिलांचे हळदीकुंकू नंतर विश्वेश्वर दास विजय शेडेकर यांचे किर्तन झाले. रात्री १० वा. श्री केदारलिंग नाटयनमन मंडळ,काटवली संगमेश्वर यांच्या बहुरंगी नमनाचा कार्यक्रम पार पडला
श्री विलास शेडेकर यांनी कार्यक्रमाचे प्रास्ताविक करुन उपस्थित मान्यवरांचे स्वागत केले नंतर मंदिर जिर्णोद्धार कार्याचा संपूर्ण आढावा घेत सर्व देणगीदार, ग्रामस्थ तसेच जागा मालक यांचे आभार मानून सहकार्याबद्दल धन्यवाद दिले.
यापुढे श्री ब्राम्हणदेव (डुरा) शेडेकर वाडी कळसवली येथे दर शनिवारी सायंकाळी किर्तन व महाप्रसादाचे नियोजन करण्यात येणार असल्याचे मंडळाच्या वतीने सांगण्यात आले