राजापूर:- (प्रमोद तरळ) तालुक्यातील तळवडे येथील नवलाई क्रिडा मंडळाच्या वतीने सरपंच गायत्री साळवी पुरस्कृत ज्येष्ठ समाजसेवक आप्पा साळवी यांच्या वाढदिवसानिमित्त तळवडे होळीचा मांड येथे भव्य ढोलवादन स्पर्धेचे आयोजन करण्यात आले होते. या स्पर्धेत शहरातील दिवटेवाडी येथील धुतपापेश्वर ढोलवादन पथकाने प्रथम क्रमांक पटकावला
या स्पर्धेचे उद्घाटन उद्योजक किरण उर्फ भैय्याशेठ सामंत यांच्या सुकन्या अपूर्वा सामंत यांच्या हस्ते करण्यात आले
यावेळी सरपंच गायत्री साळवी, मानकरी वामन तात्या गुरव, शिवकुमार लिंगायत, बाळकृष्ण पराडकर, माजी प्राथमिक शिक्षक सखाराम साळवी, सत्कारमूर्ती आप्पा साळवी, उपसरपंच यशवंत साळवी, माजी सरपंच प्रदीप प्रभुदेसाई, चंद्रकांत गुरव, युवा कार्यकर्ते राजेश उर्फ बाळुदादा साळवी, शैलेश साळवी, सुनिल गुरव, संदीप गुरव, नंदकुमार गुरव, दिलिप चिले, अमित साळवी आदी मान्यवर उपस्थित होते
या स्पर्धेत १० संघांनी सहभाग नोंदवला होता. यामध्ये रु ११ हजार १११/- चे प्रथम क्रमांक व चषक दिवटे वाडी येथील धुतपापेश्वर ढोलवादन पथकाने पटकावला. तर द्वितीय क्रमांकाचे रु ७ हजार ७७७/- व चषक हरळ गावच्या धावजीदेव ढोलवादन पथकाने मिळविला. तॄतीय क्रमांकाचे पारितोषिक रु ५ हजार ५५५/- व चषक नवलाई ढोलवादन पथक,शेढे यांनी पटकावला उत्तेजनार्थ पारितोषिक महालक्ष्मी माता ढोलवादन पथक सोल्ये यांना देण्यात आले