साखरपा – (प्रमोद तरळ) रविवार दि.१४/०४/२०२४ रोजी डॉ. बाबासाहेब स्मारक सभागृह साखरपा येथे डॉ.बाबासाहेब आंबेडकर यांची १३३ वी जयंती साजरी करण्यात आली. डॉ.बाबासाहेब आंबेडकर यांच्या जयंतनिमित्त आयोजित केलेल्या जिल्हास्तरीय रेकॉर्ड डान्स स्पर्धेमध्ये वारली नृत्य सादर करून सांस्कृतिक कलामांच दाभोळे बौद्धवाडी मधील तरुण तसेच बालकलाकारांनी प्रथम क्रमांक मिळवला . सहभागी कलाकार,अमर कांबळे,आकाश कांबळे, प्रणज्योत कांबळे,सुदेश कदम,आदर्श कांबळे, शीतल पवार, स्नेहल पवार, अंकिता, रोहिणी यांनी उत्तम प्रकारे आपली कला सादर करून त्यांनी प्रेक्षकांना मंत्रमुग्ध केले. तसेच डॉ.बाबासाहेबांच्या जीवनावर आधारित एक काल्पनिक दृश्य सादर करून लिटिल आर्ट्स ग्रुप दाभोळे बौध्दवाडी यांनी आपली कला सादर करत द्वितीय क्रमांकाचे मानकरी ठरले.यामध्ये सहभागी कलाकार,सन्मान कांबळे, श्रेयस कांबळे, श्रावणी कांबळे ,स्वराली कांबळे, सुयश कांबळे, पवन कांबळे,स्मित कांबळे, साहिल कांबळे,बुद्धराज कांबळे,अक्षता कांबळे, उन्नती कांबळे,सोहेल कांबळे,आर्यन कांबळे अशाप्रकारे कलाकार सामील होते. त्याच प्रमाणे शेतकऱ्यांच्या जीवनावर आधारित दृश्य सादर करीत अमोल जाधव गाव दाभोळे याने वयक्तिक नृत्य स्पर्धेमध्ये आपली कला सादर करून प्रथम क्रमांक मिळवला. या कलाकारांना कोरिओग्राफी म्हणून अमर अनिल कांबळे,अमोल जाधव व रोहित आंबोलकर यांनी उत्तम असे कलाकारांना प्रोत्साहन दिले. त्याचप्रमाणे दाभोळे बौध्दवाडीतील आणि गावातील ग्रामस्थांनी सर्व मुलांना उत्तम असे सहकार्य केले.
- Home
- डॉ बाबासाहेब आंबेडकर स्मारक सभागृह साखरपा येथे महामानवाची १३३ वी जयंती विविध कार्यक्रमांनी साजरी…