ठाणे:- (प्रमोद तरळ) लोकस्वराज्य फिल्म अँड टेलिव्हिजन असोसिएशन, ट्रेड युनियन भारतच्या माध्यमातून कलाकारांना काम मिळावं यासाठी आम्ही नेहमी तत्पर असतो यासाठीच लोकस्वराज्यच्या माध्यमातून ठाणे शहरात मराठी सिरीयलच शूटींग चालू आहेत त्या ठिकाणी भेट देण्याच महत्वपूर्ण काम लोकस्वराज्य कडून करण्यात आले आहे.
ज्या मालिकांना भेट दिली आहे त्यांची नावे खालीलप्रमाणे.
१) आई कुठे काय करते,
२) राणी होणार मी,
३) सुख कळले
लोकस्वराज्यचे राष्ट्रीय अध्यक्ष श्री.प्रशांत अशोकराव खानविलकर, महाराष्ट्र राज्य अध्यक्ष विशाल गवई आणि इतर पदाधिकारी यांनी हजर राहून उपस्थित दर्शवली त्याशिवाय कलाकारांना त्यांच्या जिल्ह्यात काम मिळावी तसेच काम झाल्यावर त्यांना मानधन सुद्धा वेळेत द्यावं अशी मागणी सुद्धा केली आहे त्याचप्रमाणे सर्व कलाकारांना एकसमान न्याय मिळावा यासाठी निवेदन दिले आहे.