राजापूर – (प्रमोद तरळ) फेब्रुवारी २०२४ मध्ये घेण्यात आलेल्या सिंधुरत्न टॅलेंट सर्च परीक्षेचा निकाल नुकताच जाहीर झाला असून त्यामध्ये सरस्वती विद्यामंदिर व कनिष्ठ महाविद्यालय पाचलची विद्यार्थिनी कुमारी आश्लेषा विशाल घोलप इयत्ता सातवी हिने जिल्ह्यामध्ये दुसरा क्रमांक पटकावला आहे. तर याच विद्यालयाची विद्यार्थिनी कुमारी स्नेहा सुदर्शन बाकाळकर इयत्ता सातवी हिने तालुक्यात तिसरा क्रमांक पटकावला आहे. या दोन्ही विद्यार्थिनींना वर्गशिक्षक श्री संजय पाथरे, प्रियांका पाटील, पालक विशाल घोलप, प्रणाली घोलप यांचे मार्गदर्शन लाभले. या परीक्षेमध्ये मिळवलेल्या यशाबद्दल शाळेचे मुख्याध्यापक तानाजी देसाई व सर्व शिक्षक वृंद यांनी या दोन्ही विद्यार्थिनींचे अभिनंदन केले आहे. या यशाबद्दल नुकताच या दोन्ही विद्यार्थिनींचा कै. ज्ञा. म. नारकर वाचनालय पाचल या संस्थेच्या वतीने अध्यक्ष श्री. किशोर ज्ञानदेव नारकर व ग्रंथपाल विठोबा चव्हाण यांच्या हस्ते भेटवस्तू देऊन सत्कार करण्यात आला.
- Home
- पाचल हायस्कूलची आश्लेषा घोलप सिंधूरत्न टॅलेंट सर्च परीक्षेत जिल्ह्यात दुसरी.