चामोर्शी:- संत जगनाडे महाराज ऍग्रो प्रोड्युसर कंपनीच्या सभासद शेतकऱ्यांना मोफत खते व निविष्ठा वाटप कार्यक्रम दिनांक २० ऑगस्ट २०२४ रोज मंगळवारी संताजी क्रीडांगण प्रभाग क्रमांक तीन गोंडपुरा चामोर्शी येथे माजी खासदार तथा अनु.जनजाती मोर्चा चे अशोकजी नेते यांच्या शुभहस्ते शेतकऱ्यांना मोफत खते वाटप करण्यात आले.
यावेळी कृषी विभागाचे अधीक्षक मास्तोडी साहेब,सहकार आघाडी चे जिल्हाध्यक्ष तथा नगरसेवक आशिष भाऊ पिपरे,जिल्हा उपाध्यक्ष तथा मानवाधिकार संघटनेचे प्रदेशाध्यक्ष प्रणयजी खुणे,जिल्हा उपाध्यक्ष डॉ.भारत खटी,नगरसेविका सोनाली पिपरे,सोशल मिडिया संयोजक तथा बंगाली आघाडी चे नेते रमेश जी अधिकारी,जेष्ठ नेते श्रावणजी सोनटक्के, तुळशीदास (बंडूभाऊ) नैताम,श्रीधर पेशट्टीवार,तसेच मोठ्या संख्येने शेतकरी उपस्थित होते.