गडचिरोली:-नारळी पौर्णिमा तथा रक्षाबंधन निमित्याने माजी खासदार तथा अनू.जनजाती मोर्चा चे अशोकजी नेते यांच्या गडचिरोलीतील निवासी कार्यालयात शिवसेनेच्या माता-भगिनींनी मा.खा.नेते यांना राखी बांधत औक्षण करत शुभेच्छा दिल्या. याप्रसंगी मुख्यमंत्री लाडकी बहीण या योजनेचे महिलांच्या खात्यात जमा झाल्याचा आनंद महिलांनी व्यक्त करत लाडक्या बहिणीचा मुख्यमंत्री मा.ना.श्री.एकनाथ जी शिंदे साहेब,उपमुख्यमंत्री देवेंद्र भाऊ,उपमुख्यमंत्री अजितदादा यांचे आभार मानले.
तसेच मा.खा.नेते यांनी महिला भगिनींना या योजनेचा फॉर्म भरतांना त्रास होऊ नये यासाठीं गडचिरोली व चामोर्शी या ठीकाणी कार्यालय खोलून आमच्या सारख्या अनेक महिला पात्र होऊन खात्यात रूपये जमा झाले याकरिता माजी खासदार अशोकजी नेते यांचे या रक्षाबंधन निमित्याने शिवसेनेच्या महिलांनी राखी बांधुन अभिनंदन करत आभार मानले. लाडक्या बहिणींचा अशोक भाऊ असे उदगार काढले. यावेळी शिवसेनेच्या सौ.नीताताई वडेट्टीवार महिला जिल्हाप्रमुख मागासवर्गीय विभाग,सौ.कीरण ताई राठोड,कांता म्याकलवार, कांता येरणे,बबिता गौतम,अर्चना चन्नावार,अर्चना गोरघटे,माधुरी घुगरे, व अन्य महिला उपस्थित होत्या. दखल न्यूज महाराष्ट्र