ऍड.सुनिल खंडागळे, सौ.अनघा कांगणे यांच्या नावाची कोअर कमिटीकडून नेतृत्वाकडे शिफारस.
संगमेश्वर:- गाव विकास समिती,रत्नागिरी जिल्हा संघटनेकडून चिपळूण- संगमेश्वर मतदारसंघात उमेदवार दिला जाणार असून प्राथमिक चर्चेत असणाऱ्या तीन नावांपैकी ऍड.सुनील खंडागळे व सौ.अनघा कांगणे यांच्या नावाची शिफारस कोअर कमिटीने संघटनेचे नेतृत्व अध्यक्ष उदय गोताड व संघटप्रमुख सुहास खंडागळे यांच्याकडे केली आहे.तशी माहिती संघटनेचे सरचिटणीस सुरेंद्र काब्दुले यांनी दिली आहे.
संघटनेचे उपाध्यक्ष व कृषी तज्ञ राहुल यादव यांच्यावर कोअर कमिटीकडून विधानसभा निरीक्षकाची जबाबदारी सोपवण्यात आली असून शिफारस केलेल्या उमेदवारांबाबत अंतिम निर्णय संघटनेच्या नेतृत्वाने लवकरात लवकर घ्यावा अशी विनंती कोअर कमिटी मार्फत अध्यक्ष उदय गोताड व संघटन प्रमुख सुहास खंडागळे यांना करण्यात आली आहे.
ऍड.सुनिल खंडागळे व सौ. अनघा कांगणे या कुणबी समाजातून येत असून बहुसंख्येने असणाऱ्या व राजकिय दृष्ट्या दुर्लक्षित असणाऱ्या कुणबी समाजाला प्रतिनिधित्व देण्याची भूमिका यावेळी गाव विकास समितीने घेतल्याचे यावरून स्पष्ट होत आहे.
गाव विकास समितीने कुणबी समाजाला प्रतिनिधित्व दिल्यास एडवोकेट सुनील खंडागळे यांना संधी मिळते की महिला म्हणून सौ अनघा कांगणे यांना संधी दिली जाते.याकडे अनेकांचे लक्ष लागून राहिले आहे.तरुणांची संघटना असणारी गाव विकास समिती रत्नागिरी जिल्हा संघटना वेळोवेळी संगमेश्वर तालुका, रत्नागिरी जिल्ह्यातील प्रमुख प्रश्नांवर आवाज उठवून शासन यंत्रणेला जाब विचारात असते.या संघटने कडून या विधानसभा निवडणुकीत उमेदवार दिले जाणार असून संगमेश्वर-चिपळूण मतदारसंघात गाव विकास समिती मार्फत विधानसभेची तयारी सुरू करण्यात आली आहे.गाव विकास समितीकडून एडवोकेट सुनील खंडागळे, कृषी तज्ञ राहुल यादव व महिला उपाध्यक्ष अनघा कांगणे यांच्या नावाची चर्चा संघटने अंतर्गत होती. राहुल यादव हे कृषी तज्ञ असून ते संघटनेचे प्रमुख पदाधिकारी व उपाध्यक्ष असल्याने त्यांच्यावर विधानसभा निरीक्षक पदाची जबाबदारी सोपवण्यात आली आहे. तर दुसरीकडे उमेदवारीसाठी चर्चेत असणाऱ्यामधील ऍड.सुनील खंडागळे व अनघा कांगणे यांच्या नावाची शिफारस कोअर कमिटीने संघटनेच्या नेतृत्वाकडे केले आहे. या दोघांपैकी एकाला तिकीट मिळणार असल्याने यावेळी चिपळूण संगमेश्वर मतदार संघातून कुणबी समाजाला गाव विकास तुम्ही मार्फत प्रतिनिधित्व दिले जाईल हे आता निश्चित झाले आहे.
गाव विकास समितीचे अध्यक्ष उदय गोताड आणि संघटन प्रमुख सुहास खंडागळे याबाबत नेमका काय निर्णय घेतात याकडे आता राजकीय क्षेत्रातील अनेकांचे लक्ष लागून राहिले आहे.