समिर शिरवडकर-रत्नागिरी.
राजापूर:- ( धाऊलवल्ली) :- राजापूर तालुक्यातील मौजे धाऊलवल्ली मधील काही महिन्यांपूर्वी खाडीकिनारा नजिक असलेल्या महाराष्ट्र संपत्ती असलेल्या कांदळवन ची बेकायदेशीर तोड करण्यांत आली असून याबाबत स्थानिक ग्रामस्थ रुपेंद्र विलास कोठारकर यांनी राजापूर वनपाल यांच्याकडे लेखी तक्रार दि.२४/८/२४ ला दाखल केली होती. त्या तक्रारीची दखल कांदळवन कक्ष रत्नागिरी यानी घेतली आहे.
सदर,कांदळवन तोड मौज धाऊलवल्ली सर्वे न.११३/११ क्षेत्र १.४५.०० मध्ये कांदळवन तोड झाली असुन,कारवाई करण्याबाबत रुपेंद्र विलास कोठारकर,मु,पोस्ट धाऊलवल्ली,गायळ कोकरी, तालुका राजापूर,जिल्हा रत्नागिरी यांच्या दि.२३/८/२४ च्या असून समनधित अर्जावर कारवाई करावी अश्या अश्या आशयाचे पत्र मा.वनक्षेत्रपाल कांदळवन कक्ष रत्नागिरी यांच्याकडे वर्ग केला आहे. महाराष्ट्रला ७२० किमी चा किनारपट्टी लाभली आहे,त्यात अनेक ठिकाणी कांदळवन भाग आहे,याचे रक्षण आणि जतन करणे राज्य शासनाने कर्तव्य आहे.आणि त्यासाठी एक स्वतंत्र विभाग शासनाने उभारला आहे.याप्रकरणी रत्नागिरी कांदळवन कक्ष काय भूमिका घेते याकडे लक्ष्य लागके आहे. दखल न्यूज महाराष्ट्र