राजापूर तालुक्यातील ओणी जिल्हा परिषद गटातील दौऱ्यावर असताना राजापूर-लांजा-साखरपा विधानसभा निवडणूक प्रमुख सौ. राजश्री (उल्काताई) विश्वासराव ह्या सौंदळ पाटीलवाडी येथे उपस्थित राहिल्या. यावेळी सौंदळ गावातील भाजपा पदाधिकारी श्री. काशिनाथ पाटील यांसहित ग्रामस्थांनी विकासकामांसंदर्भातील निवेदन मा. उल्काताई विश्वासराव यांना दिले. तसेच गावातील इतर विकास कामांवर सविस्तर चर्चा करण्यात आली. यावेळी श्री. विक्रांत पाटील, श्री. प्रवीण पाटील, श्री. गणेश पाटील, श्री. विशाल पाटील, श्री. सिद्देश पाटील, श्री, सुनील पाटील, श्री. प्रमोद पाटील, श्री. सिद्धांत पाटील, श्री. सारंग पाटील, श्री. अभिजित पाटील, श्री. मनीष पाटील, श्री. अविनाश कदम यांसहित गावातील इतर ग्रामस्थ व भाजपा शक्ती केंद्र प्रमुख, बुथ अध्यक्ष व कार्यकर्ते उपस्थित होते.
दखल न्यूज महाराष्ट्र.