लेख

घरात लावा ओव्याचे रोप.. ‘या’ सहा मोठ्या आजारांपासून मिळेल मुक्तता..

भारतामध्ये अशा अनेक वनस्पती आहेत की, ज्यामध्ये फार मोठे आयुर्वेदिक गुण आहेत. अनेक वनस्पतीमधून आपल्याला अनेक आजारांवर मात करण्याची शक्ती मिळते. तुळस कडुलिंब, आंबा, पेरू अशी अनेक झाडे आहेत की त्यामध्ये औषधी गुणधर्म आहेत. केवळ त्यांचे उपयोग करण्याची आपल्याला माहिती हवी. ओव्याचे झाड देखील असेच असते. यापासून आपण अनेक आजारांवर मात करू शकतात. याचा वापर आपण जेवणामध्ये खूप करत असतो व हा मसालेदार पदार्थ आहे, त्याचे खूप औषधी गुणधर्म आहेत. आम्ही आपल्याला आज या लेखामध्ये ओव्याबद्दल माहिती सांगणार आहोत. ओव्यांमध्ये प्युरिफायर तत्व असतात. जे वातावरण चांगले ठेवतात. त्यामुळे घरात ओव्याचे झाड लावून आजूबाजूचे वातावरण शुद्ध करावे.1) लघवीची समस्या : अनेक लोकांना लघवीची समस्या मोठ्या प्रमाणात असते. अशा लोकांना पुढील धोका टाळण्यासाठी घरगुती उपाय देखील करू शकतात. असे लोक डॉक्टरांकडे जातात. मात्र, त्याचा फारसा उपयोग होत नाही. आपण ओव्याचे पाणी पिल्यास आपल्या ला चांगला फायदा होऊ शकतो. यामध्ये आयर्न, सोडियम, पोटॅशियम, कॅल्शियम, ऑंटी एक्सीडेंट तत्व असतात. यामुळे याचा खूप मोठा फायदा होतो.2) फुफुस : अनेक लोकांना फुफुस आजाराची समस्या असते. अशा लोकांनी ओव्याच्या पानांच नेहमी सेवन करावे. याच्या पानामध्ये एंटीऑक्सीडेंट तत्व असतात. यामुळे तुमच्या फुफुसला कार्यक्षम करण्यामध्ये हा फार मोठा हातभार लावत असतो. ओव्याच्या पानांचे सेवन केल्याने आपल्याला खूप फायदा होतो आणि भविष्यातील आपला त्रास टाळू शकतो.3) शरीर निरोगी : ओव्यामध्ये खूप मोठ्या प्रमाणात आयुर्वेदिक गुणधर्म भरलेले असतात. ओव्या चहा पिल्याने आपले शरीर निरोगी राहण्यास मदत मिळते. ओव्याचे आठ-दहा पाणी तोडून गरम पाण्यामध्ये उकळावे आणि हे पाणी प्यावे. पाण्यामध्ये देखील टाकू शकतात यामुळे आपल्याला खूप मोठा फायदा होईल व ओव्यांमध्ये फायबर, व्हिटॅमिन, लेटेन मॅग्नीज, आयर्न असे पदार्थ देखील असतात. त्यामुळे त्याचे सेवन केल्याने आपल्याला खूप मोठा फायदा होऊ शकतो.4) हाडांची सूज : अनेक लोकांना हाडांवर सुजण्याची समस्या असते. अशा लोकांनी ओव्याचा पाण्याचा ज्युस करून घ्यावा. असे केल्याने हाडांची असूनही कमी होते. गरम पाणी करावे. त्यामध्ये ओव्याचे काही पाणी टाकावे आणि हे द्रव्य पिऊन घ्यावे. चव बदलण्यासाठी आपण यामध्ये मधाचा उपयोग देखील करू शकता.5) सर्दी खोकला : अनेकांना सर्दी खोकल्याची समस्या मोठ्या प्रमाणात असते. अशा लोकांना घरगुती उपाय करून देखील यावर मात करता येते. याचे पाने नुसते खाल्ले तरी सर्दी खोकला हा राहू शकतो. तसेच गरम पाण्यामध्ये ओव्याची पाने टाकायचे आणि हे मिश्रण प्यायचे. यामुळे आपला सर्दी खोकला कमी होऊ शकतो.6) मास पेशी : अनेक लोकांना मास पेशी दुखण्याची समस्या असते. त्या लोकांनी एका टबमध्ये गरम पाणी करावे. यामध्ये आठ दहा पाने टाकावे आणि त्यामध्ये पाय सोडून अर्धातास बसावे. यामुळे आपल्याला चांगला आराम पडतो. असा प्रयोग किमान महिनाभर करावा. यामुळे आपल्या नक्कीच फरक पडेल.

संकलन व शब्दांकन
श्रीकृष्ण पंडित
रत्नागिरी
८६६८३२९२०२

What's your reaction?

Related Posts

1 of 291

Leave A Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

error: Content is protected !!