टेनिस क्रिकेट असोसिएशन ऑफ इंडिया आणि
टेनिस क्रिकेट असोसिएशन महाराष्ट्र यांच्या संयुक्त विद्यमानाने 6 वी जूनियर U17 आणि 8वी सीनियर नॅशनल चॅम्पियनशिप 2024 नाशिक येथील MCC ग्राउंड येथे दिनांक 26 ते 29 सप्टेंबर 2024 रोजी पार पडल्या. या स्पर्धेमध्ये 17 वर्षातील महाराष्ट्र संघ प्रथम क्रमांकाने विजयी झाला. या महाराष्ट्र संघामध्ये तनिष मोहिते आणि निशांत तांबे या दोघांनी सहभाग घेऊन महाराष्ट्र संघाला विजयी करण्यात मोलाचे योगदान दिले.
तसेच 8 व्या सीनियर चॅम्पियनशिप मध्ये महाराष्ट्र संघ द्वितीय क्रमांकाचा मानकरी ठरला. या महाराष्ट्राच्या संघामध्ये रत्नागिरी जिल्ह्यातील राज कांबळे आणि सोहम मोर्ये यांचा सहभाग होता.
टेनिस क्रिकेट असोसिएशन रत्नागिरी जिल्हा अध्यक्ष सुमित अणेराव, सचिव सिद्धेश गुरव, सिलेक्शन कमिटी हेड रोशन किरडवकर, रत्नागिरी टीम कोच हर्षतेज (मनोज) पकये, टीम मॅनेजर रमाकांत कांबळे, मुचकुंदी परिसर विकास संघ लांजा उपाध्यक्ष गणेश खानविलकर, रणजीत पवार, प्रणव खानविलकर, सुरज अणेराव, सुरज गुरव, अजय मोर्ये, अमेय खानविलकर, महेश वीर, सुशांत राईन सर, दिलीप दिवाळे सर यांनी सर्वांचे अभिनंदन केले आणि पुढील वाटचालीस शुभेच्छा दिल्या.