ग्रामीण भागातील 10 सीसीटीव्ही चे सुरक्षा कवच असणारी तालुक्यातील पहिलीच प्राथमिक आदर्श शाळा भडे नं 1 ठरली .
लांजा : जि. प. आदर्श शाळा भडे नं १मध्ये 10 cctv कॅमेरे बसवण्यात आले असून या कॅमेराचे अनावरण सीसीटीव्ही ची मोहीम लांजा तालुक्यात राबवणारे लांजा पोलीस निरीक्षक मा. श्री. निळकंठ बगळे यांच्या हस्ते करण्यात आले.
लांजा तालुक्यामध्ये 10 सीसीटीव्ही कॅमेरे बसवणारी पहीलीच शाळा आदर्श शाळा भडे नं १ ठरली आहे. ग्रामीण भागातील प्राथमिक शाळेत स्व खर्चाने असे कॅमेरे बसवून शाळा व शाळेचा परिसराला एक प्रकारे सुरक्षा कवच करणे हे काम खरचं कौतुकास्पद आहे असे उद्गगार श्री. बगळे यांनी काढले. या कार्यामुळे शाळा व परिसर, तसेच गावातील मुख्य रस्ता सुध्दा सुरक्षित झाला आहे.
या उपक्रमाबद्दल संपूर्ण तालुक्यातुन जि. प. आदर्श शाळा भडे नं १ वरती अभिनंदनाचा वर्षाव होत आहे.
या प्रसंगी शाळेचे मुख्याध्यापक श्री कुड सर, श्री.तेजस मोरे (बिट अंमलदार साटवली) श्री.सागर गिरीगोसावी(गोपनिय अंमलदार लांजा पो. ठाणे) ग्रामविकास अधिकारी,. सौ. महाजन मँडम,
मा. पो पा.लावगण श्री. नंदकुमार खानविलकर ,मा सरपंच श्री. संजीवकुमार राऊत, श्री. राजेंद्र दळवी, सौ. लोखंडे मँडम, सौ. सेजल तेंडुलकर, श्री. ज्ञानेश रेवाळे यांची कार्यक्रमाला उपस्थिती लाभली.
या संपूर्ण कार्यक्रमाचे आकर्षण ठरलेले स्वागत संचलनाचे मार्गदर्शन श्री. संदिप कुमार खुटाळे सर यांनी केले, तसेच या कार्यक्रमाचे नियोजन, मा. श्री. अभिजीत माने सरांनी केले. कार्यक्रमाला श्रीम. रूची दळी मँडम यांच्या निवेदनाने साज चढवला, तर कु. तिर्था लिंगायत या विद्यार्थीनींनी आपल्या तंटामुक्त भडे गावाची माहिती उपस्थितांना दिली.सरते शेवटी पोलीस पाटील भडे श्री. प्रशांत बोरकर यांनी उपस्थितांचे व मान्यवरांचे आभार मानून कार्यक्रमाचा समारोप केला.
