➡️ मेष : आज तुमचे एक मोठे काम होईल ज्याने तुम्ही आनंदी असाल. मित्र मैत्रिणींबरोबर प्रसन्न राहाल. आपल्या मनातील विचार मांडण्यास कचरू नका. कर्ज प्रकरणासाठी फाईल पुढे केली असेल तर आज तुम्हाला कर्ज मिळेल. नातेवाईकांशी वादविवाद करू नका.
➡️ वृषभ : आरोग्याकडे लक्ष द्या वेळीच डॉक्टरांचा सल्ला घ्या. अनेक काळ कोणाकडे थकबाकी असेल तर पैसे परत मिळतील. आज तुमच्या जोडीदार रागात असू शकेल तुम्ही कोणतीही गोष्ट संयमाने घ्या शांत रहा. घरासाठी वेळ काढा.
➡️ मिथुन : आज आयुष्याचा एक दृष्टिकोन तयार करा परिस्थिती बाबत तक्रारी करून उदास होण्यापेक्षा त्यावर मार्ग काढा. जोडीदाराशी काहीशी संबंध बिघडतील. मध्यमान सिगरेट यासारख्या व्यसनांपासून आज दूर राहा. तुमचा वेळ वाया जाईल.
➡️ कर्क : कोणाशीही रागवू नका भांडू नका कारण कदाचित तुम्हाला नजीकच्या काळात त्याचा प्रशिताप करावा लागेल. प्रेमामध्ये एकतर्फी प्रेम ही चूक आहे. तुम्हाला त्याचं दुःख होईल प्रतिष्ठेला धक्का लागेल असे काही करू नका.
➡️ सिंह : वाहनाचे काम निघेल. तुमच्या आनंदाची क्षण इतरांसोबत वाटा त्यामुळे तुम्हीही प्रसन्न राहाल. तुमच्या मनातील खऱ्या भावना प्रकट करा जुन्या प्रेमाची आठवण तुम्हाला आज सतत होत राहील. तुमचा जोडीदार तुम्हाला समजून घेत नाही असा आपला समज निर्माण होईल.
➡️ कन्या : काही कारणामुळे मानसिक दृष्ट्या तुम्ही खचल्यासारखे वाटेल आज आराम कराल. प्रेमी केशी अतिभाव बोलू नका कामाच्या ठिकाणी आज दिवस खूप चांगला असणार आहे.
➡️ तुला : कुटुंबातील सदस्य मित्र मंडळी यांच्याबरोबर आनंद लुटा. दीर्घकाळ प्रलंबित असणारी थकबाकी आज मिळेल. वैवाहिक जीवन आज सुखद वाटेल. एखाद पारितोषिक, कौतुकाची थाप तुम्हाला हवी असलेली एखादी मान्यता पुढे ढकलण्यात आल्याने आज तुम्ही निराश व्हाल.
➡️वृश्चिक : कार्यालयातून आज वेळ काढून विरंगुळा आणि मौजमजा करण्यात तुमचा आजचा दिवस जाईल. समस्यांवरती मार्ग मिळेल. आर्थिक व्यवहारात लक्ष द्या. आज घरातील स्वच्छता करण्यात तुमचा कल असेल.
➡️धनु : त्रस्त आणि व्यस्त असा आजचा दिवस आर्थिक रुपात आज तुम्ही बरेच मजबूत असाल. धन कमवण्यासाठी नवीन नवीन संधी मिळेल. कर्मचाऱ्यांना नोकरीत बढती मिळू शकते. तुमचा महत्त्वाचा वेळ आज खराब होऊ शकतो. जोडीदाराबरोबर वेळ घालवा.
➡️ मकर : आजचा दिवस तुमच्यासाठी संमिश्र स्वरूपाचा असणार आहे. तणावावर मात करण्यासाठी आध्यात्मिक धार्मिक उपाययोजनांची तुम्हाला गरज वाटेल. घरातील वरिष्ठांचा तुम्ही सल्ला घेऊ शकता. विद्यार्थी लॅपटॉप किंवा टीव्हीवर सिनेमा पाहून आपले किमती वेळ घालवतील. आज तुम्हाला घरचे काम स्वतःच करावे लागणार आहे कारण कामासाठी बोलावलेली व्यक्ती आज सुट्टी घेईल.
➡️ कुंभ : काही गोष्टींमध्ये तुम्हाला माघार घ्यावी लागेल. ही माघार तुम्हाला लक्षात राहील. परिश्रम घेणे सोडू नका पुढे चालत राहा. तुम्हाला हवे असलेले काम करण्याची संधी मिळेल तुमच्या सुप्त गुणांचा आज वापर आपण कराल.
➡️ मीन: आरोग्य उत्तम राहणार आहे. मित्रांबरोबर खेळण्याचा प्लॅन कराल धनलाभ होऊ शकतो. व्यवसायात निर्णय घेताना दुसऱ्याच्या दडपणाखाली घेऊ नका, लग्नाच्या वेळी जे वचन दिलं होतं ही सगळी खरी होतील.
दखल न्यूज महाराष्ट्र.