मुंबई : सुरक्षित प्रवासासाठी मुंबईकरांवर आज मंगळवारपासून वाहतुकीच्या आणखी एका नियमाची सक्ती करण्यात येणार आहे. चारचाकी वाहनातून प्रवास करणाऱ्या प्रत्येक प्रवाशाला आता सीटबेल्ट लावणे बंधनकारक करण्यात आले आहे. मात्र, या नियमाचे पालन न करणाऱ्यांवर मंगळवारपासून दंडात्मक कारवाई न करता केवळ वाहतूक पोलिसांकडून कडक समज’ देण्यात येणार आहे. तर सीटबेल्ट सक्तीबाबत दंडात्मक कारवाई 11 नोव्हेंबरपासून सुरु करण्याचे आदेश वाहतूक पोलिसांनी दिले आहेत. मात्र लोकांमध्ये अद्याप सीट बेल्ट संदर्भात जनजागृती नसल्याने सीटबेल्टसाठी मुदत आणखी वाढवण्यात आलेली आहे.
मुंबईत अनेक कारचालकांनी अद्यापही सीटबेल्ट बसवलेले नाहीत. त्यामुळे सीटबेल्ट संदर्भात आज पासून फक्त समज दिला जाणार आहे. सीटबेल्टकरता ही मुदतवाढ देण्यात आली आहे. तसेच सीटबेल्ट सक्तीबाबत दंडात्मक कारवाई 11 नोव्हेंबरपासून सुरु करण्याचे आदेश वाहतूक पोलिस यांनी दिले आहेत. सीटबेल्टच्या सक्तीमधून जुन्या वाहनांना तात्पुरते वगळण्यात आले आहे अशी माहिती देखील वाहतूक विभागाकडून देण्यात आली आहे. *दखल न्यूज महाराष्ट्र.*