रत्नागिरी : शहरातील मुख्य रस्त्यांवरती स्पीड ब्रेकर, साईड पट्टी, डिव्हायडर, झेब्रा क्रॉसिंग, दिशादर्शक रेषा अद्याप काढलेले,पांढऱ्या रंगाचे रंगवलेले दिसत नाहीत. त्यामुळे अनेक ठिकाणी अपघात होण्याची शक्यता नाकारता येत नाही. मागील काही दिवसात रत्नागिरी शहरात स्पीडब्रेकर लक्षात न आल्याने एक मोठा अपघात मारुती मंदिर, के.सी.जैन नगर परिसरात घडला असून यानंतर असा अपघात होऊ नये. यासाठी रत्नागिरी शहरातील मुख्य रस्त्यांवरती झेब्रा क्रॉसिंग, साईड पट्टी आणि स्पीड ब्रेकर यावरती पांढरे पट्टे मारणे आवश्यक आहे.
पावसाळ्यापूर्वी नवीन रस्ते केल्यामुळे कदाचित पावसाच्या ऋतूमध्ये हे पट्टे मारणे शक्य नव्हते. मात्र पावसाचा कालावधी निघून गेला असल्याने तातडीने रत्नागिरी शहरातील सर्व स्पीडब्रेकर, साईड पट्टी पांढऱ्या रंगाने दर्शविणे गरजेचे वाटते. तरी महोदय आपण संबंधित विभागाला याबाबत सूचना कराव्या व हे काम तातडीने पूर्ण व्हावे अशी विनंती निलेश म. आखाडे भाजप भ.वि.जा. जिल्हाध्यक्ष, रत्नागिरी यांनी जिल्हाधिकारी व रत्नागिरी नगर परिषद प्रशासनाकडे केली आहे.
दखल न्यूज महाराष्ट्र.