रत्नागिरी : टेनिस क्रिकेट अससोसिएशन इंडिया आयोजित 19 वयोगटातील पाहिली राष्ट्रस्तरीय टेनिस क्रिकेट चॅम्पिनशिप उत्तर प्रदेश मधील मथुरा इथे दिनांक 7 ते 11 नोव्हेंबर 2022 ला होणार आहे. या चॅम्पियनशिप साठी अनेक जिल्ह्यातुन मुलांची निवड करण्यात आली.त्यामध्ये आपल्या रत्नागिरी जिल्ह्यातील आठ मुलांची निवड करण्यात आली आहे. ही निवड टेनिस क्रिकेट अससोसिएशन महाराष्ट्र राज्याच्या पहिल्या राज्यस्तरीय चॅम्पियनशिप मधून करण्यात आली आहे.त्या मध्ये महाराष्ट्र राज्यातून महाराष्ट्र, मुंबई, विदर्भ असे तीन संघ जाणार आहेत.
टेनिस क्रिकेट अससोसिएशन महाराष्ट्र राज्य महासचिव सौ. मीनाक्षी गिरी मॅडम, टेकनिकल डायरेक्ट स्वप्नील ठोमरे सर, महेश मिश्रा सर, विजय उमरे सर, सिद्धेश गुरव सर यांच्या नेतृवाखाली दिनांक 3 ते 5 नेव्हेंबर 2022 ला नाशिक येथील मीना ताई ठाकरे स्टेडियम ला सराव चाचणी घेण्यात आली. त्यामधून मुलांची निवड महाराष्ट्र, मुंबई आणि विदर्भ संघात करण्यात आली. रत्नागिरी जिल्ह्यातील मुलांची महाराष्ट्र संघामध्ये १. स्वरूप कदम, २ प्रथमेश जानस्कर, ३. साहिल सावंत, ४.सुयश दिवाळे,५.साहिल नामये, तसेच, मुमंबई संघामध्ये१. पियूष पवार, २.सौरभ जानस्कर, ३.वेदांत निवाते अशी निवड करण्यात आली आहे. या मुलांना प्रशिक्षण देण्याचे काम रत्नागिरी जिल्हा सचिव सिद्धेश गुरव सर, सुमित अनेराव सर, रोशन किरडवकर, रणजित पवार यांनी केले.
*दखल न्यूज महाराष्ट्र.*