राजापूर : तालुका धनगर समाज संस्था ग्रामीण व मुंबई शाखा यांच्या वतीने प्रति वर्ष प्रमाणे राजापूर तालुक्यातील धनगर समाजातील सर्व धनगर वाड्यातील प्रत्यक्ष वाडीवर जाऊन सर्व विद्यार्थ्यांना वह्या वाटपाचा कार्यक्रम करण्यात आला दरवर्षी विविध कार्यक्रम करण्यात येतात त्यातील हा एक स्तुत्य कार्यक्रम संस्थेच्या वतीने पार पाडण्यात आला यामुळे धनगर वाड्यातील विद्यार्थ्यांच्या शैक्षणिक वाढीस चालना मिळणार असल्याचे दिसून येते त्याचप्रमाणे प्रत्येक वाडीत जाऊन तेथील वस्तीवरील समस्या जाणून घेण्याचे नियोजनही पदाधिकाऱ्याने पार पडले यावेळी जिल्हा धनगर समाज संस्थेचे जिल्हा उपाध्यक्ष विलास गोरे मुंबई अध्यक्ष अनंत शिंदे मुंबई सरचिटणीस सुरेश शिंदे मुंबई मंडळ खजिनदार संतोष बावदाने तालुका संघटक सुनील काळे, तालुका कार्यवाह तथा भालावली ग्रामपंचायत सदस्य राम झोरे सर तालुका उपाध्यक्ष बबनराव शिंदे जेष्ठ पदाधिकारी तुकाराम बावदाणे साहिल झोरे सुभाष काळे आदी मान्यवर पदाधिकारी उपस्थित होते
संपूर्ण तालुक्यातील सर्व धनगर वाड्यात वह्या वाटपाचा अतिशय नेटका कार्यक्रम झाल्याने समाज बांधव समाधान व्यक्त करत आहेत.
दखल न्यूज महाराष्ट्र.