मुंबई : पोलीस भरतीची तयारी करत असलेल्या तरुणांसाठी एक आनंदाची बातमी आहे. राज्यात पोलीस भरतीची प्रक्रिया सुरू करण्यात आली आहे. आजपासून उमेदवारांना ऑनलाईन अर्ज भरता येणार आहे. कोरोना कालावधीमुळे गेली दोन वर्षे पोलीस भरती प्रक्रिया रखडली होती.मात्र आत्ता राज्यभरात तब्बल 18 हजार 331 जागांसाठी पोलीस भरती होणार आहे. राज्याच्या गृहविभागाकडून ही माहिती देण्यात आली आहे. राज्य सरकारकडून काही दिवसांपूर्वी पोलीस भरती जाहीर करण्यात आली होती. तशी जाहिरात राज्यातील अनेक वृत्तपत्रांतून प्रसिद्ध करण्यात आली होती. मात्र, काही कारणास्तव पोलीस भरतीला स्थगिती देण्यात आली. दरम्यान, आता पोलीस भरतीची प्रक्रिया सुरू करण्यात आली असून आजपासून उमेदवारांना ऑनलाईन अर्ज करता येणार आहे.
राज्यभरात तब्बल 18 हजार 331 जागांसाठी पोलीस भरती होणार असून यासाठी नोव्हेंबर महिन्याच्या अखेरपर्यंत सर्व उमेदवारांकडून ऑनलाइन अर्ज भरून घेतले जाणार आहेत. यानंतर आधी शारीरीक चाचणी आणि त्यानंतर लेखी परीक्षा घेतली जाणार आहे.
विशेष बाब म्हणजे, कोरोना काळात ज्या उमेदवारांनी पोलीस भरतीचा अर्ज भरला, अशा उमेदवारांना या भरतीत जागा मिळेल का, असा प्रश्न होता. गृहविभागाने या उमेदवारांकरिता मोठा निर्णय घेतला आहे. या उमेदवारांना पोलीस भरतीची संधी देण्याचा निरणय राज्य सरकारने घेतला आहे. म्हणजेच ज्यांची वयोमर्यादा समाप्त झाली आहे, अशा उमेदवारांना पोलीस भरतीत संधी मिळणार आहे. या निर्णयाचे स्वागत राज्यभरातून होत आहे..
*दखल न्यूज महाराष्ट्र.*