रत्नागिरी : जिल्हा शिक्षण व प्रशिक्षण संस्था ( DIET ) रत्नागिरी च्या पदाधिकारीनी माजी आमदार बाळासाहेब माने यांची भेट घेऊन आपल्या प्रलंबित मागण्या सोडवण्या विषयी विनंती केली, बाळासाहेब माने यांनी तात्काळ शालेय शिक्षण मंत्री नामदार दीपक केसरकर यांच्या कानावर विषय घातला व मंत्री महोदयानी मंत्रालयातील शिक्षण खात्याच्या अधिकाऱ्यांना बैठक लावण्याच्या सूचना केल्या
सदर संस्थेच्या प्रमुख मागण्या अशा आहेत की ,1) कोरोना काळापासून आम्हाला नियमित वेतन मिळत नाही ते आमचे वेतन नियमित मिळावे. 2) इतर राजपत्रित अधिकार्यांना 4400 चा ग्रेड पे वाढवून 4800 मिळतो त्या प्रमाणे आमचा देखील ग्रेड पे वाढवून मिळावा. या प्रमुख मागण्यासहित इतरही अनुषंगिक मागण्या करण्यात आल्या.
जिल्हा शिक्षण व प्रशिक्षण संस्थेतील अधिकारी वर्ग हा श्रेणी 2 मध्ये येतो, प्राथमिक व माध्यमिक शिक्षकांना ट्रेनिंग देणे, नवीन योजनांची माहिती देणे, अभ्यासक्रम निर्मिती व पाठ्यपुस्तक निर्मिती मध्ये भरीव योगदान असते या संस्थेचे.
जिल्हा शिक्षण व प्रशिक्षण संस्थेच्या सर्व मागण्या रास्त आहेत , त्यामुळे आपणास न्याय मिळवून देण्यासाठी शासन दरबारीं पाठपुरावा करून येत्या 3/4 महिन्यात आपल्या मागण्या मार्गी लावू असा विश्वास माजी आमदार बाळासाहेब माने यांनी दिला.