बातम्या

सार्वजनिक आरोग्य क्षेत्रात प्रशिक्षित मनुष्यबळ निर्मितीसाठी कार्यरत ‘इन्स्टिट्यूट ऑफ पब्लिक हेल्थ एज्युकेशन & रिसर्च ( आयफर ) आता यूजीसी मान्यताप्राप्त विद्यापीठांशी संलग्न दिल्ली मेडिकल हेल्थकेअर अकॅडमी चे अभ्यासक्रम राबविणार : मुख्य कार्यकारी संचालक डॉ.ऋषिकेश केळकर व संचालक अ‍ॅड.अनिश पटवर्धन यांची माहिती.

पुणे – सार्वजनिक आरोग्य क्षेत्रात प्रशिक्षित मनुष्यबळ निर्माण करण्यासाठी इन्स्टिट्यूट ऑफ पब्लिक हेल्थ एज्युकेशन अँड रिसर्च (आयफर) हा ई-लर्निंग मेडिकल एज्युकेशन प्लॅटफॉर्म  5 July 2020 रोजी सुरू करण्यात आला.  आयफर चे अनावरण  केंद्रीय मंत्री श्रीपाद जी नाईक यांनी केले होते. आयफरच्या माध्यमातून सार्वजनिक आरोग्य क्षेत्रात , डॉक्टर्स नर्सेस तसेच पॅरामेडिकल स्टाफ यांच्यासाठी एकूण  20+ नवीन अभ्यासक्रम/ प्रशिक्षण कार्यक्रम सुरू करण्यात आले आहेत. आयफर अनेक नामांकित रुग्णालये, केंद्र सरकारशी संलग्न संस्थांकडून ई-लर्निंग इन्स्टिट्यूट म्हणून मान्यताप्राप्त आहे. आयफरच्या माध्यमातून वैद्यकीय व आरोग्य क्षेत्राशी संलग्न शाखांतील विद्यार्थ्यांना आरोग्य क्षेत्रात सुसंधी प्राप्त करण्यासाठी उपयुक्त अभ्यासक्रम दुरस्थ / ई-लर्निंग पद्धतीने सुरू करण्यात आले आहेत व प्रॅक्टिकल प्रशिक्षणासाठी विविध रुग्णालय व वैद्यकीय आस्थापने यात विद्यार्थ्यांना संधी दिली जाते. आयफरचे पुणे  व रत्नागिरी, येथे, कार्यालय आहे व देशभरात अनेक शहरात प्रवेश प्रक्रिया समन्वयक उपलब्ध आहेत. आयफरमार्फत आरोग्य क्षेत्रात शिक्षण/प्रशिक्षण व आरोग्य क्षेत्रात नोकरीसाठी सुद्धा पॅरामेडिकल स्टाफ साठी प्रशिक्षणकार्यक्रम व संधी उपलब्ध करून दिल्या जातात . अनेक नामांकित वैद्यकीय आस्थापने आयफर सोबत संलग्न आहेत. माहितीसाठी संपर्क –  www.ipher.in
दखल न्यूज महाराष्ट्र

What's your reaction?

Related Posts

1 of 291

Leave A Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

error: Content is protected !!