संगमेश्वर : “‘भारत जोडो अभियान’ कॉंग्रेसच्या माध्यमातून राबवले जात आहे. कन्याकुमारी ते श्रीनगर असा प्रवास यादरम्यान केला जात असताना महाराष्ट्रात राहुल गांधी येतात आणि अकोल्यातील एका पत्रकार परिषदेत स्वातंत्र्यवीर विनायक दामोदर सावरकर यांच्याविषयी अत्यंत संतापजनक टिप्पणी करतात या गोष्टीचा आम्ही सर्व भाजपा कार्यकर्ते आणि सावरकरभक्त तीव्र निषेध व्यक्त करतो. सोबतच मी पळपुटे खासदार राहुल गांधी यांना आवाहन करते की भविष्यात कधीही स्वातंत्र्यवीर सावरकरांच्या पदस्पर्शाने पावन झालेल्या आमच्या रत्नागिरी जिल्ह्यात पाऊल ठेवायचा विचार करत असाल तर सावधान! आम्ही सर्व रणरागिणी त्यांच्या प्रतिक्षेत आहोत. स्वातंत्र्यवीर सावरकरांच्या घृणास्पद अपमानाची सव्याज परतफेड करू.” अशी संतप्त प्रतिक्रिया भाजपा संगमेश्वर महिला आघाडीच्या तालुकाध्यक्षा सौ. कोमल रहाटे यांनी दिली आहे. स्वातंत्र्यवीर सावरकर हे अनेक सशस्त्र क्रांतिकारकांचे प्रेरणास्थान होते. आमच्यासाठी तर शक्तीस्थानच आहेत. 'हिंदुत्व हेच राष्ट्रीयत्व' अशी शिकवण देणारे स्वातंत्र्यवीर तुमच्यासारख्या कद्रू व्यक्तीला कधीही समजणार नाहीत. स्वातंत्र्यवीर राष्ट्रभक्त म्हणून थोर होतेच पण रत्नागिरीमध्ये त्यांनी जे कार्य केले आहे ते दैवीच म्हणावे लागेल. समर्थांनी छत्रपती शिवाजी महाराजांना 'मर्हाठा तितुका मेळवावा' असा उपदेश केला होता. मात्र त्यानंतर शिवकालीन समाजव्यवस्था विस्कळीत झाली. जातीपातींच्या गर्तेत अडकलेल्या रत्ननगरीस दिशा देणारे दिव्य व्यक्तिमत्त्व म्हणजे स्वा. सावरकर. पतितपावन मंदिर आजही त्या सर्वांची साक्ष देत उभे आहे. स्वातंत्र्यवीर सावरकरांनी कोणत्याही राजकीय स्वार्थाशिवाय सहभोजनाचे कार्यक्रम करून आमच्या रत्नागिरीमधील समाजात चैतन्य निर्माण केले. आमच्यासाठी महात्मा गांधी वंदनीय आहेतच. पण स्वातंत्र्यवीर आमच्या मनाच्या अधिक जवळ आहेत. एकाने अहिंसा शिकवली तर दुसर्याने सशस्त्र क्रांतीचा मार्ग प्रकाशित केला. दोघांचाही उद्देश एकच होता तो म्हणजे भारतमातेचे स्वातंत्र्य. त्यामुळे आमच्यासाठी या दोन्ही महापुरुषांची विटंबना वेदनादायी आहे. असे भावनावश होऊन त्या बोलत होत्या.
स्वातंत्र्यवीर सावरकर घरोघरी पोचवण्याची मोहीम लवकरच हाती घेणार. "नुसती निदर्शने आणि जोडे मारो आंदोलन करून आता चालणार नाही. तर आपल्या मनातले स्वातंत्र्यवीर सावरकर प्रत्येक घरात पोचवण्यासाठी प्रत्येक सावरकर भक्ताने आपले योगदान देण्याची गरज आहे. 'स्वातंत्र्यवीर सावरकर राष्ट्रीय स्मारक, दादर' यांच्याशी याबाबत चर्चा करून लवकरच आम्ही याविषयी आमचा कार्यक्रम जाहीर करू. इतके दिवस राजकारणासाठी आम्ही संगमेश्वर तालुक्यातील प्रत्येक गावात फिरलो. यापुढील काही काळ तात्याराव सावरकरांबाबत लोकांच्या मनात कॉंग्रेसने पसरवलेले विष बाहेर काढण्यासाठी प्रवास करू. सर्व सावरकरप्रेमींनी या अभियानासाठी आम्हाला सहकार्य करावे. त्यासाठी
९५०३५६१८९७ या क्रमांकावर एसएमएस, व्हाट्सॲप करून आपला सक्रिय सहभाग नोंदवा असे आवाहनही सौ. रहाटे यांनी केले.

▶️ वेगवेगळ्या आजारांवर दुर्बिणीद्वारे केली जाणारी शस्त्रक्रिया आता रत्नागिरी मध्ये उपलब्ध..
▶️ प्रगत मिनिमल इनवेसिव्ह सर्जरी.
▪️ लॅपरोस्कोपिक शस्त्रक्रिया
▪️ कर्करोग शस्त्रक्रिया
▪️रोबोटिक शस्त्रक्रिया
▪️थोरॅकोस्कोपिक शस्त्रक्रिया
▪️एंडोस्कोपिक शस्त्रक्रिया
▶️ आजच संपर्क करा..
▶️ डॉ. मिहीर चितळे
संपर्क: +९१ ९९३०५ ९९४७४ www.drmihirchitale.com
चितळे नर्सिंग होम, टिळक आळी, रत्नागिरी.
फोन नंबर : 223115
📞 7263096801