राजकीय

नूतन महिला प्रदेशाध्यक्ष चित्रा वाघ यांची प्रमुख उपस्थितीत भाजपा दक्षिण रत्नागिरी यांचा 26 नोव्हेंबरला मुक्त संवाद महिला मेळावा.

रत्नागिरी : भारतीय जनता पार्टीच्या महाराष्ट्र प्रदेशाच्या नवनिर्वाचित महिला मोर्चा प्रदेशाध्यक्षा सौ.चित्राताई वाघ या हा पदभार स्वीकारल्या नंतर प्रथमच रत्नागिरी कोकण दौऱ्यावर २६ नोव्हेंबर रोजी येणार आहेत. या दिवशी रत्नागिरी शहरातील नगर वाचनालय, जयस्तंभ, रत्नागिरी येथे दुपारी 2:30 ते 5:30 या वेळेत त्यांच्या उपस्थितीत महिला मेळाव्याचे आयोजन करण्यात आले आहे.
             तरी या महिला मेळाव्यासाठी भारतीय जनता पार्टीचे जिल्हा अध्यक्ष ऍड.दीपक पटवर्धन, तसेच देवरुख नगर पंचायत नगराध्यक्षा सौ. मृणाल शेट्ये हे उपस्थित राहणार असून महिलांनी या मेळाव्यासाठी आवर्जून उपस्थित रहावे असे आवाहन भाजपच्या महिला मोर्चा जिल्हाध्यक्ष सौ. ऐश्वर्याताई जठार, महिला मोर्चा  सरचिटणीस सौ. शिल्पा मराठे, महिला तालुकाध्यक्ष सौ. तनया शिवलकर, महिला शहराध्यक्ष सौ. शोनाली आंबेरकर यांनी केले आहे.

🩺 जाहिरात..🩺
▶️ वेगवेगळ्या आजारांवर दुर्बिणीद्वारे केली जाणारी शस्त्रक्रिया आता रत्नागिरी मध्ये उपलब्ध..
▶️ प्रगत मिनिमल इनवेसिव्ह सर्जरी.
▪️ लॅपरोस्कोपिक शस्त्रक्रिया
▪️ कर्करोग शस्त्रक्रिया
▪️रोबोटिक शस्त्रक्रिया
▪️थोरॅकोस्कोपिक शस्त्रक्रिया
▪️एंडोस्कोपिक शस्त्रक्रिया
▶️ आजच संपर्क करा..
▶️ डॉ. मिहीर चितळे
संपर्क: +९१ ९९३०५ ९९४७४ www.drmihirchitale.com
चितळे नर्सिंग होम, टिळक आळी, रत्नागिरी.
फोन नंबर : 223115
📞 7263096801

What's your reaction?

Related Posts

1 of 291

Leave A Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

error: Content is protected !!