लेख

ताडोबा अभयारण्याचे कुणाला अभय?वाघांना की व्यावसायिकांना?”रिसोर्ट कल्चर ” धोकादायी.

रोखठोक.. भाग 2
          महेश पानसे
         विदभ अध्यक्ष
        राज्य पत्रकार संघ,मुंबई

ताडोबा अंधारी  वाघप्रकल्प राज्यातील सर्वात मोठा टायगर प्रोजेक्ट म्हणून नावारूपास आलेला आहे. १७२७ चौ.कि.मी क्षेत्रफळात पसरलेला ताडोब अंधारी वाघ प्रकल्प नावारुपास आणण्यात वनविभागाचा सिंहाचा वाटा आहे. वन्यप्राणी प्रजनन, सरक्षण व नैसगिंक आवास इथे असल्यानेच संपुर्ण देशात ताडोबा अंधारी टायगर प़ोजेक्ट ला मोठी पर्यटन पसंती आहे. मात्र ज्या गतीने वाघ-मानव सामना रंगत आहे व  ज्या रितीने वाघ, बिबट यांचेकडून मानवसंहार सुरु आहे ते बघता कुठेतरी घोडचुकीचे निणंय घेतले तर जात नाहीत ना? याचे चिंतन लवकरात लवकर होणे गरजेचे आहे. गत 11 महिण्याचे काळात या क्षेत्रात 45 वर जणांना वाघोबाने शिकार केले आहे.या पंकल्पालगतच्या शेतशिवार व गावकुसांमध्ये वाघोबांचे अतिक़मणाने मानवसुरक्षा कमालीची धोक्यात आली असताना पर्यटकांना आकषिंत करण्याच्या नादात,महसूल वाढविण्याच्या क्लुप्त्या शोधण्यापेक्षा संपुर्ण वनक्षेत्र संरक्षीत व सुरक्षीत करण्याकरीता दुरगामी योजना राबविल्यास मानवसंहार नियंत्रणात येऊन वनक्षेत्रालगतचे बहुसंख्य शेतकरी पुन्हा बांधावर येऊन भयमुक्त वातावरणात शेती करून उत्पादनात वाढ करू शकतील.
     ताडोबा अंधारी क्षेत्रात(कोअर व बफर झोन )प़वेशद्धार कमी करून वर्दळ कमी करण्याची अभ्यासपुर्ण अपेक्षा असताना आता संपुर्ण दिवसभर वनभ़मती सुरु करण्याची योजनेने वाघ, बिबटांचा नैसगिंक रहिवास कितपट संरक्षीत राहील हे कळायला वाव नाही.
           नुकतीच वनमंत्री ना.सुधिरभाऊ मुगंटीवार यांनी कुषीपंपांचे भारनियमन  दिवसाऐवजी रात्री करण्याचे साकडे ऊर्जामंत्री यांना घातले व ते मंजूरही झाले. वनमंत्री यांचे प़यत्न सकारात्मक असले तरी मात्र गत तिन वषॉत शेतकरी, शेतमजूरांवर झालेले वाघ बिबट हल्ले दिवसातच जास्त झाल्याचे आकडे नजरेआड करता येणार नाहीत. बफरझोन क्षेत्रालगत मोठया प्रमाणावर झालेले व होत असलेले अतिक्रमित क्षेत्र  खूले करून वाघ-बिबट रहिवास क्षेत्र वाढविणे आवश्यक समजले जाते. हे क्षेत्र कायम करून वनजिवांचा नैसगिंक रहिवास जतन केल्यास वाघ-मानव संघर्ष काही प़माणात कमी करता येईल असे काही अभ्यासू वन अधिकाऱ्यांचेही मत आहे. बाघ, बिबटांची भ्रमंती शेतशिवार, गावखेडे, व आता शहरी क्षेत्रातही सुरू झालेली आहे. मानव, पाळीवपशू, प़ाणी यांचेवर वाघ बिबट हल्ले नित्याची बाब झाली असून
दररोज सरासरी  मन सुन्न करणाऱ्या 3 ते 5 घटना घडतात. यात बळी पडलेल्यांना शाशकीय मोबदल्याच्या रूपात शाशनास मोठी राशी गमवावी
लागत आहे.
        संपुर्ण चंद़पूर  जिल्हा व गडचिरोली,गोंदिया जिल्यातील काही भागात वाघोबाचे धास्तीने शेतकऱ्यांनी शेती करणे बंद केले आहे. चंद़पूर जिहयातील मूल, सिंदेवाही, नागभीड  तालुक्यातील अनेक शेतकरी बांधवांनी वाघ,बिबट दहशतीने आपल्या जमिनी विकायला काढल्यात  मात्र वाघोबाचे धास्तीने कुणी घेत नाहीत.  ताडोबा,अंधारी वाघ सुरक्षीत क्षेत्रात आता 21 गेट ताडोबा भ़मतीसाठी उघडले गेले आहेत. मात्र या गेट च्या आधारे रिसोर्ट संस्कृती उदयास आली
आहे.वनभ्रमती कमी व झगमगाट व धिंगाने अती वाढल्याने वनक्षेत्रातील वन्यप्राण्यांचा नैसगिंक रहिवास कमालीचा बिघडल्याने वाघ, बिबट यांचे चौफेर पलायन व यामूळे तुटलेल्या अन्नशुंखलेमूळे वाघ-मानव संघर्ष कमालीचा वाढल्याचा अंदाज अनेक वन अधिकारी सुद्धा व्यक्त करतात. ताडोबा अंधारी वाघ प़कल्पातील प़वेशद्धार कमी करणे व वनक्षेत्रातील रिसोर्ट कल्चर ,झगमगाट थाबविणे आवश्यक
असल्याचे मतही मांडले जात आहे.
         21 गेट चे ऐवजी 15 गेट ही नैसगिंक गरज आहे असे बोलले जाते. इकडे तर 22 वा गेट सुरु कण्याचा तगादा श्रीमंत व्यावसायीकांनी वनविभागाकडे  लावला असल्याची चर्चा आहे. या व्यावसायीकांच्या जमिनी बफर झोन काठावर खाली पडल्या आहेत. रिसोर्ट उभे करून पैसा कमवायचा यापेक्षा वाघ, बिबट यांना नैसगिंक रहिवास उपलब्ध करून देऊन शेतकरी,शेतमजूर यांना भयमुत्त वातावरणात पोट भरण्यास मदत करण्याची गरज या धंदेवाईकांना का नसमजावी हे कळायला वाव नाही.

🩺 जाहिरात..🩺
▶️ वेगवेगळ्या आजारांवर दुर्बिणीद्वारे केली जाणारी शस्त्रक्रिया आता रत्नागिरी मध्ये उपलब्ध..
▶️ प्रगत मिनिमल इनवेसिव्ह सर्जरी.
▪️ लॅपरोस्कोपिक शस्त्रक्रिया
▪️ कर्करोग शस्त्रक्रिया
▪️रोबोटिक शस्त्रक्रिया
▪️थोरॅकोस्कोपिक शस्त्रक्रिया
▪️एंडोस्कोपिक शस्त्रक्रिया
▶️ आजच संपर्क करा..
▶️ डॉ. मिहीर चितळे
संपर्क: +९१ ९९३०५ ९९४७४ www.drmihirchitale.com
चितळे नर्सिंग होम, टिळक आळी, रत्नागिरी.
फोन नंबर : 223115
📞 7263096801

What's your reaction?

Related Posts

1 of 291

Leave A Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

error: Content is protected !!