रत्नागिरी – भारत शिक्षण मंडळाच्या देव, घैसास, कीर वरिष्ठ महाविद्यालयात आयक्यूएसी विभाग व कार्यालय यांच्यावतीने स्काॅलरशीप योजना मार्गदर्शन कार्यशाळेचे आयोजन करण्यात आले होते. कार्यशाळेला प्रमुख अतिथी म्हणून आपले सरकार सेवा केंद्र चालक अजय भिंगारे उपस्थित होते. श्री.भिंगारे यांनी विद्यार्थ्यासाठी असलेल्या स्काॅलरशीप योजनांबाबत माहिती दिली तसेच स्काॅलरशीप योजनांना लागणारी कागदपत्रे याबाबत माहिती दिली. स्काॅलरशीपचा फाॅर्म कसा भरावा व आवश्यक कागदपत्रे कशी काढावीत याबाबत मार्गदर्शन केले. विद्यार्थ्यांनी स्काॅलरशीप योजनांसाठी लागणारी कागदपत्रे वेळेत काढून घेऊन स्काॅलरशीप योजनांपासून वंचीत राहू नये व जास्तीत जास्त विद्यार्थ्यानी स्काॅलरशीप योजनांचा लाभ घ्यावा असे आवाहन केले.
यावेळी महाविद्यालयाच्या प्रभारी प्राचार्या सौ.मधुरा पाटील , उपप्राचार्या व आयक्यूएसी विभागप्रमुख सौ. वसुंधरा जाधव, ग्रंथपाल साईप्रसाद पवार,प्रा विनय कलमकर, प्रा.वैभव कीर ,प्रा वैभव घाणेकर, स्काॅलरशीप विद्यार्थी प्रतिनिधी साहिल मिरकर व श्रद्धा आंब्रे, शिक्षक, शिक्षकेतर कर्मचारी, विद्यार्थी उपस्थित होते. कार्यशाळेचे सूत्रसंचालन सौ. निलोफर बन्नीकोप यांनी केले तर वरिष्ठ लिपिक सौ. मनस्वी साळवी यांनी आभार मानले.