प्रतिनिधी : राम भोस्तेकर.
माणगाव
: तालुक्यातील मोर्बा विभागातील देगाव गाव हे लढवय्ये मराठे आणि माजी सैनिकांचे गाव म्हणून ओळखले जाते. मोर्बा विभागातील गावे आणि देगाव गावाला जोडणारा देगाव येथील रस्ता क्रमांक १३७ वरील पूल हा निकामी झाल्याने २०१७ मधील महाड सावित्री पूल दुर्घटनेनंतर वाहतुकीस बंद करण्यात आला होता,त्यानंतर सप्टेंबर २०२१ मध्ये देगाव गावचे सुपुत्र जेष्ठ नागरिक स्थानिय लोकाधिकार समिती महासंघ सदस्य तसेच शिवसेना उध्दव बाळासाहेब ठाकरे पक्षाचे दिंडोशी विभाग समन्वयक काशिनाथ महादेव गायकवाड यांनी तत्कालीन पक्ष प्रतोद आम सुनील प्रभू, तत्कालीन बांधकाम मंत्री नाम.अशोक चव्हाण, यांच्याकडे पत्रव्यवहार करून व प्रत्यक्ष भेट घेवून व त्याचा पाठपुरावा करून पुलाच्या कामाची मंजुरी करून घेतली. त्याकरिता नाबार्ड वित्तीय संस्थेकडून अंदाजित रक्कम २कोटी ३२ लाख १९ हजार मंजूर झाले.या कामाचे भूमीपूजन ४ डिसेंबर रोजी खेमदेव ग्रामस्थ देगाव मधील माजी सैनिक विठोबा मारुती परबळकर यांच्या हस्ते करण्यात आले. या कार्यक्रमप्रसंगी देगाव ग्रामस्थ गजानन गायकवाड, दिलीप गायकवाड,विजय इंगळे, मनोज इंगळे, हरेश गायकवाड, बाळा गायकवाड, एकनाथ गायकवाड, कृष्णा गायकवाड, मंगेश कदम,प्रतीक दिवेकर,मारुती गायकवाड, मंगेश गायकवाड, विलास गायकवाड, तेजप काशिनाथ ठाकूर, ऍड अनिकेत ठाकूर, विष्णु पवार,अशोक मर्चंडे आदी उपस्थित होते.कार्यक्रमाच्या वेळी सर्व उपस्थित ग्रामस्थांनी येणाऱ्या भावी कालावधीत शिवसेना उद्धव बाळासाहेब ठाकरे पक्षाशी एकनिष्ठ राहण्याचा निर्णय घेतला. माणगाव तालुक्यातील देगाव ग्रामस्थांनी माजी सैनिकांच्या हस्ते केलेले गावाच्या विकासकामाच्या भूमीपूजन कार्यक्रमाची चर्चा माणगाव तालुक्यात रंगली आहे आणि सुजाण माणगाव तालुका वासीय नागरिकांकडून देगाव ग्रामस्थांच्या या महत्वपूर्ण निर्णयाचे कौतुक होत आहे.