प्रतिनिधी : राम भोस्तेकर माणगाव
माणगांव हे तालुक्याचे ठिकाण असून मुंबई गोवा महामार्गाच्या मध्यवर्ती ठिकाणी आहे. याच माणगांव शहरात अनेक हॉटेल्स आहेत. मिळालेल्या गोपनीय माहितीनुसार स्थानिक गुन्हे अन्वेषण शाखा अलिबाग व माणगांव पोलीस यांनी एका हॉटेलमध्ये चालत असलेल्या वेश्या व्यावसायावर धाड टाकली आहे. यामध्ये २ आरोपींसह २ महिलांना पोलिसांनी ताब्यात घेतले आहे.
पोलीस सूत्रांकडून मिळालेल्या माहितीनुसार सविस्तरपणे असे की, दि. ३ डिसेंबर रोजी ७.२५ वा. मौजे साले गावच्या हद्दीत मुंबई गोवा महामार्गा लगत असलेल्या हॉटेल रॉयल पॅलेसमध्ये एक आरोपी महिला व नयन कुमार सिंह, वय २५ वर्ष, मूळ रा. चकमंजो, पो. खरगडीहा, रा. झारखंड यांनी आपसात संगनमत करून २ पीडित महिलांचा आर्थिक परिस्थितीचा फायदा घेऊन त्यांना पैशाचे आमिष दाखवून शारीरिक संबंधाकरिता ग्राहकांना पुरवीत होते. व ग्राहकांकडून पैसे घेत होते. अशा रीतीने आरोपी गरजू महिलांचा आर्थिक परिस्थितीचा फायदा घेत आरोपी त्यांना वेश्या व्यवसाय करवून त्यामधून मिळणाऱ्या पैशावर उपजीविका करीत असताना मिळून आले. त्यांच्याकडून २००० रु. जप्त करण्यात आले आहेत.
या गुन्ह्याची नोंद माणगांव पोलीस ठाण्यात कॉ. गु. र. नं. ३४७/२०२२ अनैतिक व्यापार प्रतिबंध कायदा कलम ४ व ५ प्रमाणे करण्यात आली असून पुढील तपास पो. नि. राजेंद्र पाटील करीत आहेत.
*दखल न्यूज महाराष्ट्र.*