रत्नागिरी : महाराष्ट्र राज्यातील धनगर समाजाच्या सर्वांगीण विकासासाठी काम करणारी अग्रगण्य सामाजिक संघटना,
“महाराणी अहिल्यादेवी समाज प्रबोधन मंच, महाराष्ट्र राज्य. या संघटनेच्या रत्नागिरी जिल्हाध्यक्षपदी खेड तालुक्यातील घेरारसाळगड गावचे सुपुत्र व जेष्ठ सामाजिक कार्यकर्ते श्री रामचंद्र बाबू आखाडे यांची फेरनिवड दिनांक 10/12/2022 रोजी करण्यात आली असून तसे नियुक्ती पत्र देण्यात आले असून सदर निवड पुढील तीन वर्षे कालावधीसाठी आहे.
रामचंद्र बाबू आखाडे हे मागील तीन वर्षांपासून रत्नागिरी जिल्ह्यात संघटनेचे निष्ठेने व प्रामाणिक काम करत आहेत. संपूर्ण रत्नागिरी जिल्ह्यात तळागाळापर्यंत संघटना पोहचवली असुन धनगर समाजाचे अनेक मुलभूत प्रश्न सोडवण्यासाठी संघटनेचा हातभार लागला आहे. निसर्ग चक्रीवादळ, महा अतिवृष्टी व कोराना संकट काळात संघटनेतर्फे विविध संकटग्रस्त भागात मदत मिळवून देण्यासाठी प्रयत्न केला आहे. येणाऱ्या काळात समाजाचा सर्वांगीण विकासाचे उद्दिष्ट बाळगून संघटना रत्नागिरी जिल्ह्यात पुन्हा सर्व कार्यकर्त्यांना बरोबर घेऊन जोमाने काम करेल असे रामचंद्र बाबू आखाडे यांनी जिल्हाध्यक्षपदी फेरनिवड झाल्यानंतर आपले मनोगत व्यक्त केले आहे.
रामचंद्र बाबू आखाडे यांची जिल्हाध्यक्षपदी फेरनिवड झाल्याने संपूर्ण रत्नागिरी जिल्ह्यात समाजामध्ये उत्साहाचे वातावरण आहे.रत्नागिरी जिल्ह्याला कर्तबगार जिल्हाध्यक्ष दिल्याबद्दल रत्नागिरी जिल्ह्यातील बहुतांश समाजबांधवानी राज्य कमिटीचे राजाध्यक्ष मा. मधुजी शिंदे साहेब, कोकण विभागाचे विभाग अध्यक्ष मा अनिलजी झोरे सर यांचे जाहीर आभार व्यक्त केले आहेत. रामचंद्र बाबू आखाडे जिल्हाध्यक्ष - रत्नागिरी
संपर्क नंं – 9222807942