बातम्या

आदित्य ठाकरे यांच्या हस्ते चिपळूण मधील श्री क्षेत्र टेरव देवस्थान २०२३ दिनदर्शिकेचे प्रकाशन सोहळा उत्साहात संपन्न..

चिपळूण : (ओंकार रेळेकर )श्री क्षेत्र टेरव, कुलस्वामिनी श्री भवानी वाघजाई देवस्थान २०२३ दिनदर्शिकेचा प्रकाशन व लोकार्पण सोहळा, मा. पर्यटन मंत्री, शिवसेना नेते व युवा सेना प्रमुख आदित्य ठाकरे यांच्या शुभहस्ते नुकताच कोकणचो मालवणी मोहत्सव चारकोप या कार्यक्रमात पार पडला. सदर प्रसंगी आमदार सुनील प्रभू, विभाग प्रमुख सुधाकर सुर्वे, म. विभाग संघटक मनाली चौकीदार, मा. नगरसेविका शुभदा गुढेकर, मा. नगरसेवक शंकर हुंडारे, टेरवचे सुपुत्र आणि युवा सेना कार्यकारणी सदस्य रूपेश कदम, विधान सभा प्रमुख संतोष राणे, शाखाप्रमुख शाखा क्रमांक १९, निखिल गुढेकर उपस्थित होते. गेली ११ वर्षे भाविक व ग्रामस्थांना आकर्षक, दर्जेदार व परिपूर्ण दिनदर्शिका भेट देण्यात येत आहे. सालाबादप्रमाणे या वर्षीही दिनदर्शिकेला वाढती मागणी आहे. टेरव गावातील प्रत्येक घरात तसेच मुंबई, पुणे, ठाणे, सुरत इ. शहरात वास्त्यव्यास असलेल्या ग्रामस्थांना सदर दिनदर्शिकेचे निःशुल्क वितरण करण्यात येणार आहे. तसेच सह सचिव, गृह विभाग, महाराष्ट्र शासन व दिपक केसरकर, शिक्षण मंत्री, यांचे खाजगी सचिव मंगेश शिंदे, अध्यक्ष श्री स्वामी समर्थ सेवा मंडळ सेक्टर ९, चारकोप, सदानंद जाधव, जगविख्यात तुतारी व शंख वादक, संस्थापक अध्यक्ष शिवकालीन तुतारी लोककला मंडळ पांडुरंग गुरव, प्रतिथयश उद्योजग आणि अडरे गावचे सुपुत्र अनंतराव कदम, नाट्य- सिने क्षेत्रातील प्रख्यात अभिनेते उमेश कामत, अथर्व नाकती, भारत गणेशपुरे, मराठी बाणाचे सर्वेसर्वा अशोक हांडे, अभिनेत्री वंदना गुप्ते, दीप्ती लेले या व इतर अनेक मान्यवरांना सदर दिनार्शिका भेट देवून देवस्थानाच्या वतीने सन्मानित करण्यात आले. देवस्थानात तसेच टेरव गावात साजरे होणारे सार्वजनिक सण, उत्सव व इतर सर्व धार्मिक कार्यक्रमांची माहिती या दिनदर्शिकेत समाविष्ट करण्यात आली आहे. अजित कदम व सुधाकर कदम यांनी सर्व जाहिरातदार व उपस्थितांचे आभार मानले.

What's your reaction?

Related Posts

1 of 295

Leave A Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

error: Content is protected !!