Uncategorized

ग्रामपंचायत निवडणूकीसाठी मतदान क्षेत्रातील खासगी आस्थापनांच्या कामगारांना सुटी

रत्नागिरी : जिल्हयातील सर्व खाजगी कंपन्या यामधील आस्थापना, सर्व दुकाने व इतर आस्थापना, निवासी हॉटेल, खादयगृहे, अन्य गृहे, नाट्यगृहे, व्यापार, औदयोगिक उपक्रम किंवा इतर आस्थापना तसेच माहिती तंत्रज्ञान कंपन्या, शॉपींग सेंटर, मॉल्स, रिटेलर्स इ. आस्थापनांनी जिल्हयात १८ डिसेंबर २०२२ रोजी ग्रामपंचायत सार्वत्रिक निवडणूका होत असल्या कारणाने सर्व आस्थापनांनी त्यांचे आस्थापनामधील कामगारांना निवडणुकांच्या दिवशी मतदानाचा हक्क बजावण्यासाठी जिल्हयातील मतदान क्षेत्रामध्ये अत्यावश्यक सेवा देणाऱ्या दुकाने व आस्थापना वगळून सर्व आस्थापना सकाळी ७:०० ते सायंकाळी ६.०० या वेळात बंद ठेवण्यात याव्यात. त्या दिवशी बंद राहिलेल्या दुकाने आस्थापनांमधील कर्मचाऱ्यांच्या वेतनातून कोणत्याही प्रकारची कपात करण्यात येऊ नये. आवश्यक सेवा देण्याऱ्या आस्थापनांनी व माहिती तंत्रज्ञान नियत व्यवसायात असलेल्या कंपन्या, कायम असंघटीत उत्पादन सुरु असलेल्या कंपन्यामधील कामगारांना मतदानाचा हक्क बजावण्यासाठी दोन तासांची सवलत देण्यात यावी किंवा भर पगारी सुट्टी देण्यात यावी, असे आवाहन सहाय्यक कामगार आयुक्त, रत्नागिरी यांनी कळविलेले आहे. सर्व दुकाने व इतर आस्थापना, निवासी हॉटेल, खादयगृहे, अन्य गृहे, नाटयगृहे, व्यापार, औदयोगिक उपक्रम किंवा इतर आस्थापना तसेच माहिती तंत्रज्ञान कंपन्या, शॉपींग सेंटर, मॉल्स, रिटेलर्स इत्यादी आस्थापनांनी आपल्या कामगारांना १८ डिसेंबर २०२२ रोजी ग्रामपंचायत सार्वत्रिक निवडणकीस मतदान करीता सुट्टी नाकारत असतील अथवा दोन तास सुट्टी करीता मनाई करत असतील अशा आस्थापनातील कामगारांनी सहाय्यक कामगार आयुक्त, रत्नागिरी फोन नं. ०२३५२-२२३१०९ येथे संपर्क साधावा, असे सहाय्यक कामगार आयुक्त, रत्नागिरी यांनी कळविले आहे.

What's your reaction?

Related Posts

1 of 291

Leave A Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

error: Content is protected !!