चिपळूण : (ओंकार रेळेकर) मुली शिकल्या तर खऱ्या अर्थाने त्या भविष्यात देशाचा आधारस्तंभ बनतील शिक्षणाशिवाय आपली प्रगती होणार नाही. मुलींनी शिक्षणात पुढे यावे. मुली शिकल्या तरच पुढची
पिढी सुधारू शकेल. आपल्या मातापित्यांचा आधार बनू शकेल, असे मत माजी मंत्री आ. हसन मुश्रीफ यांनी व्यक्त केले. मिरज येथे शनिवारी आयोजित नायकवडी शिक्षण संस्थेच्या विविध कार्यक्रम आणि उद्घाटन सोहळ्याला उपस्थित असताना आमदार हसन मुश्रीफ बोलत होते.
महात्मा ज्योतिबा फुले व सावित्रीबाई फुले यांच्या शैक्षणिक कार्याची व त्यागाची त्यांनी माहिती दिली. वेळेचा
सदुपयोग करा. कारण गेलेली वेळ परत येत नाही. मोबाईल व मल्टीमीडियाचा गरजेपुरता व योग्य वापर करा. विद्यार्थ्यांनी शिक्षणाची कास धरावी. आपला व आपल्या समाजाचा विकास करावा. मुलींनी शिक्षणात पुढे यावे,असे मत जे. एम. बी. आर. ग्रुप ऑफ कंपनीचे प्रमुख बशीरभाई हजवांनी यांनी व्यक्त केले.
नाईकवडीज् ग्रुप ऑफ इन्स्टिट्यूटस् , आझाद शिक्षण संस्था संचलित जवाहर हायस्कूल अँड ज्युनिअर कॉलेज मिरज येथे जनाब इलियास नायकवडी सभागृह उद्घाटन सोहळा,जवाहर ज्युनिअर कॉलेज ऑफ सायन्सचा शुभारंभ आणि संस्थापक संचालक परिवारांचा सन्मान कार्यक्रम माजी मंत्री,आमदार हसन मुश्रीफ , जे.एम.बी.आर ग्रुप दुबईचे प्रमुख उद्योगापती,बशीरभाई हजवानी यांच्या प्रमुख उपस्थितीमध्ये शनिवारी मिरज येथे संपन्न या वेळी मार्गदर्शन करताना उद्योजक बशीर हजवांनी बोलत होते.
नाईकवडीज् ग्रुप ऑफ इन्स्टिट्यूटस् , आझाद शिक्षण संस्था संचलित जवाहर हायस्कूल अँड ज्युनिअर कॉलेज मिरज येथे जनाब इलियास नायकवडी सभागृहाचे उदघाटन माजी मंत्री, कोल्हापूर जिल्ह्यातील कागल विधानसभा मतदार संघाचे राष्ट्रवादी काँग्रेसचे आमदार हसन मुश्रीफ यांच्या हस्ते झाले आणि जवाहर ज्युनिअर कॉलेज ऑफ सायन्सचा शुभारंभ उद्योगपति बशीरभाई हजवांनी यांच्या हस्ते झाला.आ.हसन मुश्रीफ यांनी या वेळी महात्मा ज्योतिबा फुले, सावित्रीबाई फुले यांच्या शैक्षणिक कार्याची व त्यागाची त्यांनी माहिती दिली.शासन स्तरावर राबविण्यात येणारी श्रावण बाळ योजना, संजय गांधी निराधार योजना,राजीव गांधी आरोग्य योजना,कामगार कल्याण योजना यांचा त्यांनी आढावा घेतला. भविष्यकाळात अधिक चांगल्या कल्याणकारी योजना सुरू करण्याचा मानस त्यांनी या वेळी व्यक्त केला एन.जी.आय.संस्था शैक्षणिक क्षेत्रात करत असलेल्या कार्याची त्यांनी प्रशंसा केली. संस्थेच्या भावी वाटचालीविषयी उज्वल भविष्याविषयी शुभेच्छा व्यक्त केल्या. याप्रसंगी अब्दुल मजीद गुलाबसो सतारमेकर यांचा राष्ट्रीय संगीत नाटक अकॅडमी पुरस्कार मिळाल्याबद्दल सत्कार करण्यात आला. आझाद शिक्षण संस्थेचे संस्थापक संचालक कुटुंबीयांचाही सत्कार करण्यात आला. हाजी महंमदशफी हाजीचांद बागवान, बाबासो महंमद हनीफ मोमीन, महंमद मोहियोदि्न मुश्रीफ, इब्राहिम रज्जाक मुजावर(फैजसर), इसहाक इब्राहिम मुश्रीफ, शमशोद्दीन इसहाक शरीकमसलत, अब्दुल गफार साहेब, मुरसल,महंमद साहेब, इमाम साहेब, मुतवल्ली, शमशोद्दीन बाबालाल मुतवल्ली, महेबूब घुडूसो मुतवल्ली, जैनुद्दीन शमशुद्दीन शरीकमसलत,नबीसो अमीन मुश्रीफ, कमालसो इमाम मुश्रीफ,अब्दुलअजीज अब्दुलमुजीब मुतवल्ली, सुलतानसो फरीदसो शरीकमसलत, सय्यद , पीरहजरत इनामदार,हाजी अमीर हमजा कमालसो पटवेगार या संस्थापक संचालक परिवारांचा आमदार हसन मुश्रीफ यांच्या हस्ते सत्कार करण्यात आला.जलाल कादिरी, आरीफ मुल्लाजी, रऊफ खतीब सर,श्रीराज पटेल,मुनाफ दादम, खालिद चोगले, अस्लम हजवांनी,शिराज हजवांनी,बिलाल ममतुले, कबरुद्दीन हजवांनी,अब्ब्रार खान,इब्राहिम हजवांनी,हिदायत जमादार, एकबर ताज,जमाल नदाफ, श्री. अरबाज नांदगावकर,,आझाद शिक्षण संस्थेच्या अध्यक्षा हसीना नायकवडी, आयेशा नायकवडी, अतहर नायकवडी, शाळेच्या मुख्याध्यापिका सौ. रिज्वाना मुजावर, उपमुख्याध्यापक श्री.जी.बी.पीरजादे, पर्यवेक्षक श्री.लतीफ मुलाणी, शिक्षक शिक्षकेतर कर्मचारी विद्यार्थी व पालक मोठ्या संख्येने उपस्थित होते. कार्यक्रमाचे सूत्रसंचालन श्री.जी.बी. पीरजादे व सौ.एफ.एम. पटेल यांनी केले. आभार प्रदर्शन श्री.जी.बी. पीरजादे यांनी व्यक्त केले. एनजीआय ग्रुप मिरजचे अध्यक्ष श्री.इद्रिस नायकवडी यांनी प्रास्ताविकात संस्थेच्या साठ वर्षातील कार्याचा आढावा घेतला. संस्थापक सदस्यांनी केलेल्या त्यागाचा व प्रतिकूल परिस्थितीत स्थापन केलेल्या संस्थेचा आज मोठा विस्तार झाल्याचे त्यांनी स्पष्ट केले.रवींद्र देवमाने आणि शिक्षक सर्व कर्मचारी यांनी कार्यक्रम यशस्वी होण्यासाठी विशेष मेहनत घेतली.
फोटो : जनाब इलियास नायकवडी सभागृह उद्घाटन सोहळा,
जवाहर ज्युनिअर कॉलेज ऑफ सायन्सचा शुभारंभ प्रसंगी
आमदार हसन मुश्रीफ,बशीरभाई हजवानी इद्रीस नाईकवडी, अतहर नायकवडी श्रीमती हसीना नायकवडी, जी .बी पीरजादे छायाचित्रात दिसत आहेत (छाया : ओंकार रेळेकर) फोटो : जनाब इलियास नायकवडी सभागृहाचे फित कापून
उद्घाटन करताना आ.हसन मुश्रीफ, बशीरभाई हजवांनी ,हजवानी इद्रीस नाईकवडी, अतहर नायकवडी
जलाल कादिरी ,
मुनाफ नदाफ,
छायाचित्रात दिसत आहेत (छाया : ओंकार रेळेकर)