देवरुख शिक्षण प्रसारक मंडळाच्या आठल्ये-सप्रे-पित्रे
कनिष्ठ महाविद्यालयाचा मुलांचा खो-खो संघ (१९ वर्षाखालील) रत्नागिरी जिल्ह्याचे विजेतेपद प्राप्त करून कोल्हापूर विभागीय शालेय स्पर्धेसाठी पात्र ठरला आहे. सदर स्पर्धा सांगली येथे संपन्न होणार आहेत. महाविद्यालयाच्या संघाने जिल्हा अजिंक्यपद प्राप्त करताना पहिल्या सामन्यात राजापूर संघाचा १ डाव व ४ गुणांनी, तर दुसऱ्या सामन्यात रत्नागिरी संघाचा १ डाव व ६ गुणांनी सहज मात केली. चुरशीच्या अंतिम सामन्यात लांजा संघाचा २ गुणांनी मात करून विजेतेपदाला गवसणी घातली. राष्ट्रीय खो-खो दिनाच्या निमित्ताने रत्नागिरी जिल्हा शालेय विजेतेपद प्राप्त करणाऱ्या आणि जिल्हा रायगड, धाटाव (रोहा) येथे संपन्न झालेल्या ४८व्या राज्यस्तरीय कुमार खो-खो अजिंक्यपद व निवड चाचणी स्पर्धेत सहभागी झालेल्या विद्यार्थी खेळाडूंचा गौरव प्राचार्य डॉ. नरेंद्र तेंडोलकर यांच्या प्रमुख उपस्थितीत करण्यात आला.
जिल्हा विजेत्या संघातील खेळाडू- अस्मित सरफरे, साहिल धावडे, सम्यक कांबळे, साहिल कदम, नितीन शेळके, प्रथमेश कुळ्ये, राज गुरव, ऋषिकेश सुवारे, साहिल आग्रे, करण घुग, साहिल कुळये, समीर गुरव, सुजल गुरव, सुरज कुळ्ये.
राज्यस्तरीय कुमार स्पर्धेतील सहभागी विद्यार्थी- सुजल सनगले, दर्शन सनगले, साहिल धावडे, सुमित उबारे, अस्मित सरफरे.
याप्रसंगी उपप्राचार्य डॉ. सरदार पाटील, कनिष्ठ महाविद्यालय जिमखाना समन्वयक प्रा. अनंत पाध्ये, प्रा. धनंजय दळवी, क्रीडा शिक्षक प्रा. सागर पवार, प्रा. विजय मुंडेकर, प्रा. स्वप्नाली झेपले, प्रा. शिवराज कांबळे यांची प्रमुख उपस्थिती होती.
गौरव प्राप्त खेळाडूंची ओळख व त्यांच्या खेळातील कौशल्य याबाबतची माहिती प्रा. धनंजय दळवी यांनी दिली. यानंतर प्राचार्य डॉ. नरेंद्र तेंडोलकर यांनी विद्यार्थ्यांना मार्गदर्शन करताना सांगितले की, खो-खो हा खेळ गतिमान असून त्याचा सतत सराव करणे गरजेचे आहे. शारीरिक तंदुरुस्तीसाठी परिपूर्ण आहारासोबत रोजची शारीरिक मेहनत गरजेची असल्याचे प्रतिपादन केले. फास्ट फूड खाणे व मोबाईलचा सतत वापर टाळणे गरजेचे असल्याचे आग्रही मत याप्रसंगी त्यांनी व्यक्त केले. प्रा. सागर पवार यांनी आभार व्यक्त केले. या सर्व यशस्वी विद्यार्थ्यांना संस्थाध्यक्ष सदानंद भागवत, नेहा जोशी, कुमार भोसले, शिरीष फाटक, ॲड. वेदा प्रभुदेसाई, पर्यवेक्षक प्रा. एम. आर. लुंगसे तसेच सर्व शिक्षक व शिक्षकेतर कर्मचारी यांनी अभिनंदन करून पुढील वाटचालीस शुभेच्छा दिल्या.
फोटो- विद्यार्थ्यांच्या सत्कार प्रसंगी प्राचार्य डॉ. तेंडोलकर, उपप्राचार्य डॉ. पाटील, प्रा. पाध्ये, प्रा. पवार इत्यादी.
छाया प्रा. धनंजय दळवी.