रत्नागिरी : कोकण रेल्वे मार्गावर ख्रिसमससाठी आणखी दोन विशेष गाड्या जाणार आहेत. उधना ते मंगळुरू तसेच अहमदाबाद ते करमाळी आशा या दोन विशेष गाड्या आहेत. यातील आमदाबाद ते करमाळी दरम्यान धावणारी विशेष गाडी वीज डिसेंबर पासून लावणार आहे. हिवाळी पर्यटन हंगाम तसेच ख्रिसमसच्या पार्श्वभूमीवर कोकण रेल्वे मार्गावर आणखीन दोन विशेष गाड्या जाहीर करण्यात आले आहे.
यापैकी उधना ते मंगळूरु (09057/09058) ही विशेष गाडी दि. 21 डिसेंबर 2022 ते 1 जानेवारी 2023 या कालावधीत धावणार आहे. आठवड्यातून दोनदा ही गाडी धावणार आहे. बुधवार आणि रविवारी ही गाडी उधना जंक्शन येथून मंगळूर साठी धावणार आहे. उधना स्थानकावरून ही गाडी रात्री 8 वाजता सुटून दुसऱ्या दिवशी मंगळुरूला सायंकाळी साडेसहा वाजता पोहोचेल. परतीच्या प्रवासात ही गाडी मंगळूरु जंक्शहून दि. 22 डिसेंबर 2022 ते 2 जानेवारी 2023 या कालावधीत दर गुरुवार आणि सोमवारी धावणार आहे. दुसरी विशेष गाडी (09412/09211) अहमदाबाद ते गोव्यातील करमाळी दरम्यान धावणार आहे. अहमदाबाद येथून ही गाडी 20 ते 27 डिसेंबर 2022 या कालावधीत दर मंगळवारी धावणार आहे. परतीच्या प्रवासात ही गाडी 21 डिसेंबर ते 28 डिसेंबर या कालावधीत धावणार आहे. आमदाबाद येथून ही गाडी सकाळी 9.30 वाजता सुटून दुसऱ्या दिवशी पहाटे पाच वाजता ते करमाळीला पोहोचणार आहे तर करमाळी ते अहमदाबाद या मार्गावर धावताना 9.20 वाजता सुटून दुसऱ्या दिवशी सकाळी सात वाजता या दोन्ही ख्रिसमस विशेष गाड्या वसई पनवेल मार्गे कोकण रेल्वे मार्गावर येणार आहेत.
*दखल न्यूज महाराष्ट्र.*