रत्नागिरी : लांजा तालुक्यातील भडे, गावखडी आणि आजूबाजूच्या गाव परिसरात बिबट्याचे दर्शन होत आहे. दोन दिवसांपूर्वी गावखडी परिसरात काही तरुणांना बिबट्याचे दर्शन झाले. तर आज भडे गावांमधील श्री संजय जनार्दन सुर्वे यांच्या पाळीव जनावरांवरती बिबट्याने हल्ला करीत जखमी केले. यामध्ये जनावरांना गंभीर दुखापत झाली आहे. सदरची बाब तेथील वन अधिकारी यांच्या कार्यालयाशी संपर्क करून कळवण्यात आल्याचे कळते. मात्र वन अधिकारी काही कामानिमित्त बाहेर असल्यामुळे याबाबत अद्याप कोणतीही दखल घेण्यात आलेली नाही. शेतकऱ्यांचे झालेले नुकसान याचा पंचनामा करून त्वरित नुकसान भरपाई मिळावी यासाठी वनविभागाने लवकरात लवकर पावले उचलावीत अशी अपेक्षा शेतकरी वर्गातून व्यक्त केली जात आहे. तसेच दहशत पसरविणाऱ्या या बिबट्याला जेलबंद करून त्याचा बंदोबस्त करावा अशी मागणी होत आहे.
दखल न्यूज महाराष्ट्र.
