रत्नागिरी – भारत शिक्षण मंडळाच्या देव, घैसास, कीर महाविद्यालयात आयक्यूएसी विभाग, इतिहास विभाग यांच्या संयुक्त विद्यमाने अल्पसंख्यांक हक्क दिवस साजरा करण्यात आला . महाविद्यालयाच्या प्रभारी प्राचार्या सौ.मधुरा पाटील यांनी या कार्यक्रमाला शुभेच्छा दिल्या. कार्यक्रमाला अल्पसंख्यांक दिनाबद्दल माहिती सांगण्यात आली. तसेच अल्पसंख्याकांसाठी पंतप्रधानांनी १५ कलमी योजना आखल्या आहेत त्याबद्दल माहीती दिली. अल्पसंख्यांक हक्क दिनानिमित्त महाविद्यालयातील विद्यार्थ्याची निबंध स्पर्धा, भित्तीपञक विभाग व इतिहास विभाग यांच्या संयुक्त विद्यमाने भित्तीपत्रक स्पर्धा घेण्यात आली. यावेळी महाविद्यालयाच्या उपप्राचार्या सौ. वसुंधरा जाधव , इतिहास विभाग प्रमुख सौ रिया बंडबे, अर्थशास्ञ विभाग प्रमुख दिप्ती कदम, प्रा. मिथिला वाडेकर, प्रा. दिपिका मयेकर तसेच विद्यार्थी उपस्थित होते. कार्यक्रमाचे सूत्रसंचालन चिन्मयी पालकर व आदित्य पायरे याने य आभार मानले.
- Home
- देव,घैसास,कीर महाविद्यालयात अल्पसंख्यांक हक्क दिन साजरा