संगमेश्वर :- कोकणची माणसं ही संस्कारक्षम असल्याने प्रामाणिक आहेत . येथे सर्व जाती धर्मामध्ये सलोखा आणि आपलेपणा आहे . देशात कोठेही गेलात तरीही महाराष्ट्र आणि त्यातही कोकणला जेवढे महत्व आहे तेवढे अन्य कोणालाही नाही . पिढी घडविण्याचे काम आणि त्यांच्यावर संस्कार करण्याचे महान कार्य व्यापारी पैसा फंड संस्थेच्या पैसा फंड इंग्लिश स्कूल आणि कनिष्ठ महाविद्यालयाने केले आहे असे गौरवोद्गार मुंबई उच्च न्यायालयाचे वकील आणि चिपळूणचे सुपूत्र ॲड . ओवेस पेचकर यांनी काढले .

व्यापारी पैसा फंड संस्थेच्या पैसा फंड इंग्लिश स्कूलच्या वार्षिक स्नेहसंमेलनातील विविध गुणदर्शन कार्यक्रमात प्रमुख पाहुणे म्हणून ॲड. ओवेस पेचकर हे बोलत होते . यावेळी व्यासपीठावर संस्था अध्यक्ष अनिल शेट्ये , उपाध्यक्ष किशोर पाथरे , सचिव धनंजय शेट्ये , मुख्याध्यापक सचिनदेव खामकर , पर्यवेक्षक दिलीप मोरगे आदि मान्यवर उपस्थित होते . संस्थेतर्फे ॲड . ओवेस पेचकर यांचा शाल श्रीफळ आणि स्मृतिचिन्ह देवून सन्मान करणात आला . यावेळी बोलताना ॲड . पेचकर पुढे म्हणाले की , मुंबई गोवा महामार्गासाठी आपण उच्च न्यायालयात जनहित याचिकेच्या माध्यमातून लढा देत आहोत त्याला आता यश येताना आपल्या सर्वांना दिसत आहे . चिपळूणला जो महाप्रलय आला त्यावर देखील आपण जनहित याचिका दाखल केली होती . त्यावर न्यायालयाच्या आदेशानुसार योग्य उपाययोजना झाल्याने गतवर्षी चिपळूणची पुरापासून मुक्तता झाली . आपणही सर्वसामान्य विद्यार्थ्याप्रमाणेच होतो . मात्र जिद्द आणि चिकाटीच्या जोरावर आपण येथपर्यंत पोहचलो आहोत . आपण देखील जिद्द आणि चिकाटी सोडू नका असे आवाहन अखेरीस त्यांनी विद्यार्थ्यांना केले . वैविध्यता असलेल्या विद्यार्थ्यांच्या विविध गुणदर्शन कार्यक्रमांचे त्यांनी मनापासून कौतूक केले . कार्यक्रमाचे सूत्रसंचालन अर्चिता कोकाटे यांनी तर आभार प्रदर्शन पर्यवेक्षक दिलीप मोरगे यांनी केले .

▶️ राजस्थान A-1 मार्बल आणि ग्रेनाईट स्वस्त आणि मस्त कोल्हापूर दरात रत्नागिरी येथे उपलब्ध.
👆सेल👆स्वस्त👆सेल👆
🏡🏡🏡🏡
▶️ मार्बल, ग्रेनाईट, हॅण्डीक्राफ्ट, फ्लोअर बाथरूम, किचन टाईल्स, मूर्तीचे भरपूर व्हरायटी
➡️ राजस्थान मार्बल अँड ग्रेनाईट
▶️ स्वप्नातील घर (वास्तू )साकारताना अवश्य भेट द्या..
▶️ रत्नागिरी – कोल्हापूर हायवे, आकाशवाणी केंद्रसमोर, खेडशी, रत्नागिरी
📲 डोनर जैन
📞8209894117
▶️ दखल न्यूज महाराष्ट्र.