बातम्या

नदीच्या किनारी नदीला म्हणावेतुझे पूर माझ्या नसातून व्हावे :जेष्ठ कवी प्रा.अशोक बागवे

महाराष्ट्राचा लाडका कवी म्हणून सुपरिचित असणारे जेष्ट कवी अशोक बागवे नवनिर्माण महाविद्यालयातील एन एस कॅम्पच्या विद्यार्थ्यांसोबत संवाद करण्यासाठी खास दांडेआडोम येथे कॅम्प स्थळी आले त्यांचे सोबत जेष्ट कवी सतीश सोळांकुरकर, गझलकार कॅ.वैभव दळवी आणि प्रतिथयश सुत्रसंचालक साहित्यिक विलास कुवळेकर यांनी थेट मुलांशी संवाद केला. राष्ट्रीय सेवा योजनेच्या विद्यार्थ्यांनी स्वतःला ओळखून आदर्श आणि जबाबदार व्यक्ती म्हणून पूढे येताना स्वतःचा आरसा स्वतः बनायला शिकायला हवे. व्यक्ती लहानपणी मी नंतर आम्ही आणि आम्हीचा आपण बनणे हेच खरे एन एस एस आहे. असे मत ज्येष्ठ कवी प्रा. अशोक बागवे यांनी एस पी हेगशेट्ये महाविद्यालयाच्या आंडेआडोम येथील राष्ट्रीय सेवा योजना निवासी शिबीराच्या सांगता समारंभा प्रसंगी व्यक्त केले. यावेळी वैभव दळवी यांची तुफानाशी सामना करणारी गझल आणि बागवे यांची नदीच्या किनारी या कवितेने बहार आणली.

🛑 रत्नागिरीत मणक्याच्या आजारावर तपासणी
आयुर्झिलच्या ट्रिटमेंटने दरवर्षी ५००० पेक्षा जास्त मणक्याच्या शस्त्रक्रिया टाळल्या जातात.
आपणही सांध्या मणक्याच्या शस्रक्रिया टाळू शकता, आयुर्झिलच्या उपचारपद्धतीने दर महिन्याला मिळते अनेकांना वेदनांपासुन मुक्ती
रत्नागिरी जिल्ह्यातील रुग्णांच्या प्रतिक्रिया पहा:
https://youtu.be/dRHIp6TL1QU
https://youtu.be/KQ1CtNWU2FU
https://youtu.be/tdUIQNGBJMA
https://youtu.be/lx7JaGg_WDY
https://youtu.be/tdUIQNGBJMA
https://youtu.be/Aiq2FHqmCrI
https://youtu.be/8-KGjzgF9Sc
https://youtu.be/ZNp7zY5h_cI
https://youtu.be/5UoA-Gx6WFU
इतर अनेक प्रतिक्रिया आमच्या युट्यूब चॅनलवर पाहू शकता
एक्सरे, एमआरआय पेक्षा कमी खर्चात संपूर्ण उपचार
♦️ नियम ♦️
१.गर्दी टाळण्यासाठी अगोदर नावनोंदणी अत्यावश्यक
२. क्लिनिकने दिलेल्या वेळेतच हजर रहाणे बंधनकारक
🏪 उपलब्ध उपचार:-
मणकाविकार, कंबरदुखी, मान- पाठदुखी, गुडघेदुखी, संधीवात, सांधेदुखी, पॅरालिसिस
शाखा: अलिबाग | दापोली | चिपळूण | रत्नागिरी | कोल्हापूर | कणकवली
पत्ता-
🏥
आयुर्झिल स्पाइन क्लिनिक्स
सिद्धिविनायक अपार्टमेंट
ICICI Bank समोर,
माजगाव रोड, मारूती मंदिर,
रत्नागिरी
नावनोंदणी संपर्क: www.ayurzeal.com
☎ 9819424233

या सांगता समारंभा प्रसंगी सावित्रीबाई फुले जयंती निमित्त मान्यवरांच्या हस्ते प्रतीमेस पुष्पहार अर्पण करून अभिवादन करण्यात आले. या वेळी अशोक बागवे पूढे व्यक्त होतांना कविता सादर केले कविता सादर करताना मराठी भाषा सोपी असते परंतु अनेक वेळेस अवजड करून लिहिली जाते विविध प्रकारचे काव्यं सहज सोप्या भाषेत करता येतात असे मत व्यक्त केले. यावेळी कॅप्टन दळवी यांनी मार्गदर्शन करताना एस, एम जोशी, महात्मा गांधी यांना स्मरण करून कविता सादर केले. व अनुभव कथीत करत युवकांची भुमिका स्पष्ट केले. दरम्यान सतिश सोळांकुरकर यांनी बीएआरसी येथे काम करतांनाचे अनुभव व्यक्त करताना विकासातील संशोधनाचे महत्त्व सांगितले. यावेळी अॅडव्होकेट कुवळेकर यांनी कविता सादर केली.
दांडेआडोम येथील 28 डीसेंबर पासून सुरू झालेल्या श्रमसंस्कार निवासी शिबीरा दरम्यान स्वयंसेवकांनी वनराई बंधारे बांधणे, साफसफाई करणे, शोषखड्डे खोदणे, या सारखी श्रमदानाच्या माध्यमातून कामे केली. यावेळी विद्यार्थ्यांना हिराचे झाडू तयार करण्याचे प्रशिक्षण देण्यात आले. यावेळी महाविद्यालयाच्या प्राचार्या डॉ आशा जगदाळे, नवनिर्माण शिक्षण संस्थेचे चेअरमन अभिजित हेगशेट्ये यांनी विद्यार्थ्यांना उद्बोधीत केले. सांगता समारंभा प्रसंगी कवी अशोक बागवे, कॅप्टन दळवी, सतिश सोळांकुरकर, अॅडव्होकेट कुवळेकर, लेखिका रश्मी कशेळकर अभिजित हेगशेट्ये, महाविद्यालयाच्या प्राचार्या डॉ आशा जगदाळे. प्रा. सुकुमार शिंदे, एन एस एस कार्यक्रम अधिकारी प्रा सुशील साळवी, प्रा. तेजस्वी या कांबळे, प्रा. पालकर प्रा. सायली कांबळे आणि एन एस एस स्वयंसेवक स्वयंसेवक उपस्थित होते.

जाहिरात..

What's your reaction?

Related Posts

1 of 297

Leave A Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

error: Content is protected !!