रत्नागिरी : रत्नागिरीतील कर्ला येथे प्रौढेने राहत्या घरी गळफास घेत आपले जीवन संपवले आहे. ही घटना सोमवार २४ ऑक्टोबर रोजी दुपारच्या सुमारास उघडकीस आली. शमशाद शौकत मुकादम ( ५५, रा . कर्ला, रत्नागिरी ) असे त्यांचे नाव आहे.
पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, शमशाद मुकादम या घरात एकट्याच रहात होत्या . सोमवारी दुपारी त्यांनी घराच्या सिलिंग फॅनला नायलॉन दोरीने गळफास घेत आत्महत्या केली. शहर पोलिसांना याची माहिती मिळताच, त्यांनी तातडीने घटनास्थळी धाव घेत, मृतदेहाचा पंचनामा करून, उत्तरीय तपासणीसाठी जिल्हा शासकीय रुग्णालयात पाठविला. विच्छेदन झाल्यानंतर मृतदेह नातेवाईकांच्या ताब्यात देण्यात आला. शमशाद यांच्या आत्महत्येमागे नेमके कारण असावे याचा तपास शहर पोलीस घेत आहेत.


