खेड : आज मुरडे ग्रामपंचायत कार्य क्षेत्रातील रेशन कार्ड धारकांस दीपावली निमित्त आनंदाचा शिधावाटप या महाराष्ट्र शासनाकडून आलेल्या योजनेअंतर्गत सरपंच तथा दक्षता समीती अध्यक्ष सौ सोनाली जाधव यांचे हस्ते देण्यात आला.सदर कार्यक्रमास, माजी सरपंच दशरथ खामकर माजी सरपंच/पत्रकार दिगंबर दळवी, मा.ग्रा.सदस्य सौ रेश्मा खामकर, सौ.अंजनी शिबे, रेशन दुकान चालक अरुण शिबे, सामाजिक कार्यकर्ते सखारामजी खेडेकर,बबन जावळे, सिद्धेश खामकर, अक्षय शिबे, रमेश खेडेकर तसेच गावातील महीला वर्ग उपस्थित होते. संपूर्ण गावात या योजनेतील 320 लाभार्थीस लाभ मिळणार असून आज दिवसभरात 209 लाभार्थीपर्यंत लाभ घेतला असून उद्यापर्यंत सर्व कार्ड धारकांस लाभ मिळणार आहे.महाराष्ट्र शासनाच्या या योजने बाबत गावातील जनसामान्य लाभार्थींनी समाधान व्यक्त केले असून मुख्यमंत्री श्री एकनाथ शिंदे व उपमुख्यमंत्री देवेंद्रजी फडसणविस यांचे मनापासून आभार मानून दीपावली निमित्त शुभेच्छा दिल्या आहेत. दखल न्यूज महाराष्ट्र.


