रत्नागिरी – रत्नागिरी शहरापासून काही अंतरावर असलेल्या शिरगाव शेट्ये नगर येथे आज पहाटे ५ वाजता गॅस सिलेंडरचा मोठा स्फोट झाला आहे. या स्फोटात कुटुंबातील चार जण अडकले होते. त्यापैकी दोघांना बाहेर काढण्यात यश आले असून दोघे अद्याप ढिगाऱ्याखाली अडकले आहेत.
या स्फोटात दोघे जखमी असून त्यांना रुग्णालयात दाखल करण्यात आले आहे. रेस्क्युसाठी पोलिस, रत्नागिरी नगरपालिका अग्निशामक दल, शिरगांव सरपंच फरीदा रज्जाक काझी, सामाजिक कार्यकर्ते, रेस्क्यू टीम दाखल झाली आहे. ढिगाऱ्याखाली अडकलेल्या दोन महिलांना बाहेर काढण्याचे काम सुरू आहे. त्यासाठी क्रेन मशिन देखील दाखल झाल्या आहेत. स्फोट एवढा भीषण होता की, आजुबाजूच्या तीन किलोमीटरच्या परिसरामध्ये याचा आवाज आला. परिसरातील घरांवरही याचा परिमाण झाला आहे. या स्फोटामुळे शेजारच्या घरांच्या काचा उडून काहीजण जखमी झाले आहेत. आजूबाजूच्या घरांचेही यामध्ये नुकसान झाले आहे. बचाव कार्य मदत कार्य, अद्याप सुरू आहे. दखल न्यूज महाराष्ट्र.
