रत्नागिरी – भारत शिक्षण मंडळाच्या देव घैसास कीर वरिष्ठ महाविद्यालयात आयक्यूएसी विभाग, भूगोल विभाग व गोगटे-जोगळेकर महाविद्यालय भूगोल विभाग यांच्या संयुक्त विद्यमाने आयोजित भूगोल प्रदर्शनाचे( जिओत्सवाचे) गोगटे जोगळेकर महाविद्यालयाचे प्रभारी प्राचार्य डॉ.प्रफुल्लदत्त कुलकर्णी यांच्या हस्ते करण्यात आले. या उद्घाटन कार्यक्रमाला देव घैसास कीर कला वाणिज्य विज्ञान वरिष्ठ महाविद्यालयाच्या प्रभारी प्राचार्या सौ. मधुरा पाटील, गोगटे-जोगळेकर महाविद्यालय भूगोल विभागप्रमुख डॉ.सुरेंद्र ठाकूरदेसाई, उपप्राचार्या सौ. वसुंधरा जाधव, भूगोल विभाग प्रमुख सौ.ऋतुजा भोवड, विनायक गावडे, शिक्षक, शिक्षकेत्तर कर्मचारी उपस्थित होते.
भूगोल विषयक प्रदर्शनात विविध प्रकारचे खडक, संशोधन प्रकल्प, नकाशे, उपग्रहीय प्रतिमा, भौगोलिक उपकरणे, दुर्मिळ नॅशनल जीओग्राफीचे १९६० पासून संग्रहीत केलेले अंक, सर्वेक्षण उपकरणे इ.मांडणी करण्यात आली होती. भूगोल विषयक प्रदर्शनात गोगटे-जोगळेकर महाविद्यालय व देव, घैसास कीर महाविद्यालयातील भूगोल विषयाच्या विद्यार्थ्याचा सहभाग होता. या भूगोल प्रदर्शनाला संस्था पदाधिकारी, भूगोल प्रेमी, शहरातील शाळा महाविद्यालयातील विद्यार्थी, शिक्षक, शिक्षकेतर कर्मचारी यांनी उत्स्फूर्त प्रतिसाद दिला. सुमारे २००० जणांनी या प्रदर्शनाला भेट दिली. प्रदर्शनाच्या प्रवेशद्वारासमोर सेल्फी पॉईंटही ठेवण्यात आला होता. उद्घाटन कार्यक्रमाचे सूत्रसंचालन प्रा.दिप्ती कदम यांनी केले.
दखल न्यूज महाराष्ट्र.

*जय संताजी* *मोरया मोबाईल्स आणि इलेक्ट्रॉनिक्स*
*टीव्ही, फ्रीज, ए.सी.,वॉशिंग मशीन, कूलर, डिफफ्रिजर, होम थिएटर,ओव्हन, वॉटरप्युरिफायर, फॅन इत्यादी ग्रुहपयोगी इलेक्ट्रॉनिक वस्तूंचे परिपूर्ण दालन*
*उपलब्ध सुविधा欄:*
*✔️बजाज फायनान्स*
*✔️HDFC फायनान्स*
*✔️अतिजलद सेवा***
*✔️घरपोच सेवा***
*✔️कमीत कमी डाऊनपेमेंट***
*उपलब्ध ब्रँड:*
*LG, Samsung, Whirpool, Godrej, Voltas, DAIKIN, BLUESTAR,LLOYLD, XIAOMI, REALME, ONEPLUS, Symphony, TCL, Hyundai, Crompton*
*या पहा, खात्री करा आणि खरेदी करा आपल्या मनपसंत वस्तू अगदी बाजारभाव पेक्षा कमी दरात उपलब्ध*
*आजच भेट द्या ♂️珞*
*आमचा पत्ता*✍:-
*मोरया मोबाईल्स आणि इलेक्ट्रॉनिक्स*
*गाळा नंबर ४ ५ डी.जे. स्क्वेअर, प्रमोद महाजन क्रीडा संकुल समोर, रत्नागिरी ४१५६१२*
*9922682666*