बातम्या

सरपंच डाटा एन्ट्री ऑपरेटर म्हणून काम करू शकत नाही शासनाच्या ग्रामविकास विभागाचे पत्रक. जिल्ह्यातील हरपुडे सरपंचांचे पद धोक्यात.

रत्नागिरी : ग्रामपंचायत सरपंच हा  ग्रामपंचायतीमध्ये डाटा एन्ट्री ऑपरेटर म्हणून काम करू शकत नाही अशा आशयाचे पत्रक महाराष्ट्र शासनाच्या ग्रामविकास विभागाने राष्ट्रीय ग्राम स्वराज अभियानच्या संचालकांनी मागवलेल्या अभिप्रायावर दिले आहे. परिणामी रत्नागिरी जिल्ह्यातील हरपुडे ग्रामपंचायत मध्ये डेटा इन्ट्री ऑपरेटर म्हणून काम करणाऱ्या सरपंचावर आता या पत्रकानुसार कारवाई होण्याची शक्यता निर्माण झाली आहे.
             ग्रामपंचायत सरपंच हा डाटा एन्ट्री म्हणून ऑपरेटर म्हणून काम करत असल्यास हे ग्रामपंचायत अधिनियम 19 59 च्या कलम 14 फ चे उल्लंघन असल्याचे ग्रामविकास विभागाने या पत्रकात म्हटले आहे. रायगड मधील ग्रुप ग्रामपंचायत शेडसई मधील उपसरपंच हेच डाटा एन्ट्री ऑपरेटर म्हणून काम करत असल्याबाबतच्या प्रकरणात राष्ट्रीय ग्राम स्वराज अभियान,पुणे संचालकांनी राज्य शासनाच्या ग्रामविकास विभागाकडे अभिप्राय मागवला होता. यावर उत्तर देताना ग्रामविकास विभागाच्या कक्ष अधिकाऱ्यांनी म्हटले आहे की,ग्रामपंचायत मधील आपले सरकार सेवा केंद्र हे ग्रामपंचायतीच्या नियंत्रणाखाली असून येथील केंद्र चालकांना ग्रामपंचायतीच्या स्वनिधीतून मानधन अदा करण्यात येते. उपरोक्त अभियानातील तरतुदी विचारात घेता उपसरपंच व केंद्र चालक या पदावर एकाच व्यक्तीला काम करता येणार नाही. ग्रामपंचायत अधिनियम 1959 मधील कलम 14 फ अन्वये जी व्यक्ती पंचायतीच्या नियंत्रणाखाली किंवा पंचायतीच्या स्वाधीन असलेले कोणतेही वेतनी किंवा लाभार्थीपद धारण करत असेल अशी व्यक्ती, असे पद धारण करत असेल त्या मुदतीत, पंचायतीचा सदस्य असणार नाही किंवा सदस्य म्हणून असल्याचे चालू राहणार नाही.असा दाखला  ग्राम विकास विभागाने दिला आहे.परिणामी ग्रामविकास विभागाच्या या निर्णयामुळे रत्नागिरी जिल्हाधिकारी यांनी एप्रिल 2022 मध्ये डेटा इन्ट्री ऑपरेटर पदावर काम करणाऱ्या हरपुडे ग्रामपंचायत सरपंचांबाबत दिलेल्या निर्णयावर याचा परिणाम होणार आहे. रत्नागिरी जिल्हाधिकारी यांनी सरपंच हे डाटा एन्ट्री ऑपरेटर असल्याबाबत त्यांचे पद रद्द होत नसल्याचा निर्णय एप्रिल 2022 मध्ये दिला होता. मात्र त्यानंतर 29 जुलै 2022 मध्ये, म्हणजेच अवघ्या तीन महिन्यात राज्य शासनाच्या ग्रामविकास विभागाने डाटा एन्ट्री ऑपरेटर हे सरपंच पदावर किंवा सदस्य पदावर राहू शकत नाहीत असे पत्रक संचालक  राष्ट्रीय ग्राम स्वराज्य अभियान यांना काढल्यामुळे हरपुडे सरपंच यांच्यावर कारवाईचा मार्ग मोकळा झाला असल्याचे बोलले जात आहे.
             “आम्ही सुरुवातीपासून सांगत होतो.. अशा प्रकरणात जिल्हा प्रशासनाने  राज्य शासनाकडून अभिप्राय मागवायला हवा होता! सरपंचच डेटा एन्ट्री ऑपरेटर असेल तर ग्रामीण लोकशाही मुळात धोक्यात येते. नागरिकांची काम खोळंबतात.सरपंच कामाला गेल्यास ग्रामपंचायत मध्ये ऑपरेटर जागेवर नसतो.चुकीचे पायंडे यामुळे पडू शकतात. असे सुहास खंडागळे, संघटन प्रमुख
गाव विकास समिती,रत्नागिरी जिल्हा यानी म्हंटले.
दखल न्यूज महाराष्ट्र.

▶️ रत्नागिरी येथील चितळे नर्सिंग होम येथे..
▶️100 पेक्षा जास्त ऑपरेशन दुर्बिणीद्वारे यशस्वी..
▶️ऑपरेशनमुळे पेशंट पूर्णपणे रोगमुक्त..
▶️कोणताही त्रास न होता पेशंट लगेच फिरू लागल्याने अत्यंत समाधानी..
▶️ 70 वर्षे वयाच्या वृद्ध आजीचे तोंडाच्या कर्करोगाचे ऑपरेशन होऊन रोगमुक्त झाल्या व आनंदी आयुष्य जगत आहेत.
▶️8 वर्ष मूल नसलेल्या जोडप्याला Ovarian drilling व पुढील उपचारामुळे आपत्यप्राप्ती झाली.
▶️हर्नियाच्या अनेक पेशंटना कोणत्याही चिरफाड न करता दुर्बिणीद्वारे ऑपरेशन करून खुप फायदा झाला ते समाधानी आहेत.
▶️काही हर्नियाच्या पेशंटचे 3-3 वेळ ऑपरेशन होऊन परत त्रास होऊ लागल्याने दुर्बिणीने ऑपरेशनमुळे व्याधीमुक्त झाले
▶️ गर्भाशयाचा कॅन्सर, ट्युमर यासाठी देखील अनेक शस्त्रक्रिया होऊन पेशंट व्याधीमुक्त झाले.
▶️ बीजकोषाचे ट्युमर सिस्ट यावर उपचार.
▶️ पित्ताशय पित्त खडे दुर्बिणीद्वारे शस्त्रक्रिया दुसऱ्या दिवशी घरी.
▶️ अवघड अपेंडिक्सच्या शस्त्रक्रिया व इतर अनेक स्तानांचा कर्करोग, आतड्यांचा कर्करोग, अन्ननलिकेचा कर्करोग यावर उपचार शस्त्रक्रिया
▶️ रुग्णांना मोफत सल्ला.
▶️ डॉ. मिहीर चितळे.
चितळे नर्सिंग होम. टिळक आळी रत्नागिरी.
संपर्क : 7263096801.

What's your reaction?

Related Posts

1 of 291

Leave A Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

error: Content is protected !!