काही लोकांना धडा शिकविण्यासाठी तुम्ही कोणत्याही मतदारसंघातून लढा, असे पक्षप्रमुख उद्धव ठाकरे यांनी सांगितले तर मी लढण्यास तयार आहे”, असे सांगत ठाकरे सेनेचे नेते आमदार भास्कर जाधव यांनी रत्नागिरी विधानसभा मतदारसंघातूनही मी लढण्यास तयार असल्याचे सूतोवाच केले.दापोली-खेड- मंडणगडमधील आमदार हा उद्धव ठाकरे शिवसेना पक्षाचाच असेल, त्या दृष्टीने आवश्यक बेरीज केली आहे”, असेही ते यावेळी म्हणाले..रत्नागिरी विधानसभा मतदारसंघातून तुम्ही निवडणूक लढवण्यास इच्छुक आहात का? असा प्रश्न त्यांना माध्यमांनी विचारला असता जाधव म्हणाले, ”गुहागर मतदारसंघ माझ्यासाठी पूर्णतः सुरक्षित आहे. तिथे कोणीही आले तरीही त्याला संधी मिळणार नाही. मात्र, पक्षाला ज्यांनी त्रास दिला आहे त्यांना धडा शिकवायचा आहे, असे पक्षप्रमुखांना वाटत असेल तर यशापयशाची किंवा निर्णय बरा-वाईट लागेल याची चिंता न करता ते सांगतील त्या मतदारसंघातून निवडणूक लढवण्यास सज्ज आहे. मी लढणारा शिवसैनिक आहे. पाठीमागे हात घेऊन बसणारा नाही. जो कोणी उमेदवार समोर येईल, त्याला दे माय धरणी केल्याशिवाय राहणार नाही”, असं ते म्हणाले.

टीव्ही, फ्रीज, ए.सी.,वॉशिंग मशीन, कूलर, डिफफ्रिजर, होम थिएटर,ओव्हन, वॉटरप्युरिफायर, फॅन इत्यादी ग्रुहपयोगी इलेक्ट्रॉनिक वस्तूंचे परिपूर्ण दालन
उपलब्ध सुविधा🤝:
✔️बजाज फायनान्स
✔️HDFC फायनान्स
✔️अतिजलद सेवा
✔️घरपोच सेवा
✔️कमीत कमी डाऊनपेमेंट**
🎯उपलब्ध ब्रँड:
LG, Samsung, Whirpool, Godrej, Voltas, DAIKIN, BLUESTAR,LLOYLD, XIAOMI, REALME, ONEPLUS, Symphony, TCL, Hyundai, Crompton
या पहा, खात्री करा आणि खरेदी करा आपल्या मनपसंत वस्तू अगदी बाजारभाव पेक्षा कमी दरात उपलब्ध
आजच भेट द्या 🏃🏻♂️🤗
आमचा पत्ता✍🏻:-
मोरया मोबाईल्स आणि इलेक्ट्रॉनिक्स
गाळा नंबर ४ ५ डी.जे. स्क्वेअर, प्रमोद महाजन क्रीडा संकुल समोर, रत्नागिरी ४१५६१२
9922682666