देवरुख शिक्षण प्रसारक मंडळाच्या आठल्ये-सप्रे-पित्रे महाविद्यालयाची विद्यार्थिनी लीडिंग कॅडेट अमिषा संतोष केदारी(२ महाराष्ट्र नेव्हल युनिट, एन.सी.सी., रत्नागिरी) हिची कर्तव्यपथ, नवी दिल्ली येथे होणाऱ्या प्रजासत्ताक दिनाच्या परेडसाठी(संचलनासाठी) निवड झाली आहे. महाविद्यालयातून निवड झालेली आमिषा केदारी ही दुसरी विद्यार्थिनी आहे, यापूर्वी राजेंद्र विनोद सावंत याची जानेवारी २०१९च्या प्रजासत्ताक दिनाच्या परेडसाठी निवड झाली होती. यावर्षी अमिषा केदारी हिच्या निवडीमुळे पुन्हा एकदा महाविद्यालयाच्या मुकुटात मानाचा तुरा खोवला गेला आहे. महाविद्यालयात सन २०१६ पासून नेव्हल एन.सी.सी.चा, तर आर्मी एन.सी.सी.चा आरंभ सन २०१९ मध्ये झाला आहे. अमिषा केदारी हिने इयत्ता बारावी पासून (शैक्षणिक वर्ष २०२१-२२) नेव्हल एन.सी.सी. मध्ये सहभाग घेतला. सध्या ती एन.सी.सी.च्या दुसऱ्या वर्षांमध्ये, तर महाविद्यालयात प्रथम वर्ष, कला या वर्गात शिकत आहे. महाविद्यालय जून,२०२२ पासून आर.डी.सी. कॅम्पमध्ये सहभाग घेण्याकरता प्रशिक्षण सुरू होते. कोल्हापूर येथे पहिला कॅम्प १३ ऑगस्ट, २०२२ पासून सुरू झाला. त्यानंतर पुणे येथे राज्यभरातून आलेल्या ११६ कॅडेट्समधून काटेकोर निवड चाचण्यानंतर तीची निवड करण्यात आली. आर.डी.सी. परेड करता तिने प्रचंड मेहनत घेतली आहे. आर.डी.सी. परेड निवडीच्या तयारीसाठी तिला माजी विद्यार्थी कल्पेश मिरगल याचे मोलाचे मार्गदर्शन लाभले. अमिषा केदारी हिच्या यशाचे कौतुक करताना प्राचार्य डॉ. नरेंद्र तेंडोलकर म्हणाले की, अमिषाने मिळवलेले हे यश प्रचंड मेहनत, जिद्द व चिकाटीने मिळवले असून याचा आम्हा सर्वांना अभिमान वाटतो. आमिषाचे यश हे इतर विद्यार्थ्यांनाही प्रेरणादायी ठरणार असल्याचे याप्रसंगी सांगितली. यावर्षीची प्रजासत्ताक दिनाची प्रत्यक्ष परेड पाहण्यासाठी सर्वांनी https://youtu.be/o_97TWc2DZ4 या लिंकचा वापर करावा, असे आवाहन प्राचार्य डॉ. नरेंद्र तेंडोलकर यांनी केले आहे. अमिषाला कमांडिंग ऑफिसर राजेशकुमार, सब-लेफ्टनंट प्रा. उदय भाट्ये, सी.टी.ओ. प्रा.सानिका भालेकर यांचे मार्गदर्शन लाभत आहे. अमिषाच्या यशाचे संस्थाध्यक्ष सदानंद भागवत, नेहा जोशी, कुमार भोसले, शिरीष फाटक, ॲड. वेदा प्रभुदेसाई, प्राचार्य डॉ. नरेंद्र तेंडोलकर, उपप्राचार्य डॉ. सरदार पाटील, तसेच सर्व प्राध्यापक व प्राध्यापकेतर कर्मचारी यांनी अभिनंदन करून पुढील वाटचालीस शुभेच्छा दिल्या.
दखल न्यूज महाराष्ट्र.

▶️ राजस्थान A-1 मार्बल आणि ग्रेनाईट स्वस्त आणि मस्त कोल्हापूर दरात रत्नागिरी येथे उपलब्ध.
👆सेल👆स्वस्त👆सेल👆
🏡🏡🏡🏡
▶️ मार्बल, ग्रेनाईट, हॅण्डीक्राफ्ट, फ्लोअर बाथरूम, किचन टाईल्स, मूर्तीचे भरपूर व्हरायटी
➡️ राजस्थान मार्बल अँड ग्रेनाईट
▶️ स्वप्नातील घर (वास्तू )साकारताना अवश्य भेट द्या..
▶️ रत्नागिरी – कोल्हापूर हायवे, आकाशवाणी केंद्रसमोर, खेडशी, रत्नागिरी
📲 डोनर जैन
📞8209894117
▶️ दखल न्यूज महाराष्ट्र.