Uncategorized

रत्नागिरी जिल्हा काँग्रेसची बैठक झाली मोठ्या उस्तहात संपन्न.

रत्नागिरी : प्रतिनिधिता.२३ हाथ से हात जोड़ो अभियान यशस्वी करण्यासाठी जिल्हाभरातून मोठ्या संख्येने पदाधिकारी उपस्थित राहून काँग्रेस भवन कार्यालय येथे जिल्हा काँग्रेसची महत्वाची बैठक मोठ्या उस्ताहात संपन्न झाली. सदर बैठकीच्या सुरुवातीला जिल्हाध्यक्ष अविनाश लाड यांच्या हस्ते काँग्रेस पक्षाचा झेंडा फडकवला गेला. त्यावेळी भारत माता की जय, वंदे मातरम्,काँग्रेस पक्षाचा विजय असो, राहुल गांधी आगे बढ़ो हम तुम्हारे साथ है ,अश्या घोषणांनी काँग्रेस भवन परिसर दणाणून गेला होता. सदर बैठकीला प्रदेश काँग्रेस कडून समन्वयक ॲड.प्रवीण ठाकूर व रत्नागिरी निरीक्षक ॲड गुलाबराव घोरपडे यांनी मार्गदर्शन करताना सांगितले की भारत जोडो यात्रा भारतातल्या सामान्य नागरिकांना जनतेला जाग्रूत करण्यासाठी होती आणि त्याची समाप्ती येत्या ३० जानेवारीला काश्मीर मध्ये होणार असून त्याची माहिती प्रत्येक घरारघरात पोहचली पाहिजे त्यासाठी काँग्रेसने हा तासे हात जोडो याचा सिम्बॉल तयार केला असून त्याचे परिपत्रक तयार करण्यात आले आहे. त्यामध्ये जनतेला भेडसावणाऱ्या प्रश्नाची जसे की वाढती महागाई, बेरोजगारी ,गॅस, पेट्रोल डिझेल यांच्या वाढत्या किमती यासाठी कांग्रेस पक्ष रस्त्यापासून ते संसदे पर्यंत प्रत्येक दिवशी या वाईट गोष्टी विरोधात लढू.आम्ही एक असा भारत घडवण्याचा दृढ संकल्प केला आहे,जिथे प्रत्येक भारतियांकडे सामाजिक संपन्नतेबरोबरच आर्थिक समृद्धीची समान संधी असेल,जिथे शेतकऱ्यांना त्यांच्या शेतमालाचा योग्य भाव मिळेल.,युवकांना रोजगार मिळेल,लहान आणि मध्यम वर्गातील उद्योगांना प्रोत्साहन मिळेल,डिझेल – स्वस्त असेल,रुपया डॉलर प्रमाणे मजबूत असेल आणि गॅस सिलेंडरच्या किमती ५०० रुपया पेक्षा जास्त नसतील. सदर अभियानाचे जाहिरातचे फलक प्रत्येक तालुक्यात मुख्य ठिकाणी म्हणजे एसटी स्टँड तहसीलदार कार्यालय गर्दीच्या ठिकाणी लावावे जेणे करून एक माहोल तयार होईल अशी मागणी सोशल मीडिया विभाग जिल्हाध्यक्ष कपिल नागवेकर यांनी आपल्या भाषणामध्ये केली. तरी सदर बैठकीला जिल्हाअध्यक्ष अविनाश लाड, मा.आ.हुस्नाबानु खलीपे, सामाजिक न्याय विभाग प्रदेश अध्यक्ष अशोक जाधव, ओबीसी विभाग प्रदेश उपाध्यक्ष दीपक राऊत,वरिष्ठ उपाध्यक्ष अनिरुद्ध कांबळे, ग्राहक संरक्षण विभाग जिल्हाध्यक्ष राजेश पतियानी,अनुसूचित जाती जमाती जिल्हाध्यक्ष रघुनाथ आडिवरेकर, अल्पसंख्यांक जिल्हाध्यक्ष हरीश शेकासन, महिला जिल्हाध्यक्षा ॲड अश्विनी आगाशे,सुरेश कातकर, जिल्हा सरचिटणीस बंडुशेठ सावंत, महिला तालुकाध्यक्ष रिझवाना शेख,जिल्हा सरचिटणीस अशपाक काद्री, जिल्हा चिटणीस शब्बीर भाटकर, युवक काँग्रेसचे चेतन नवरंगे, तालुकाध्यक्ष विकास पाटील,रियाज ठाकूर, दत्ता परकर, शहराध्यक्ष लियाकत शाह,रमेश शाह, रवी खेडेकर, गजानन पिलंकर,खलील सुर्वे, हनीफ खलिपे, सुभाष मांडवकर, बंटी गोताड, विधान सभा क्षेत्रअध्यक्ष सचिन मालवणकर, गजानन दली इत्यादी कार्यकर्ते बहुसंख्येने उपस्थित होते. दखल न्यूज महाराष्ट्र.

BuyBack Offers
चालू किंवा बंद अथवा तुटलेल्या स्थितीत असलेल्या फोन ची योग्य किंमत मिळवा आणि खरेदी करा नवीन फोन➡️
सोबत EMI सुविधा उपलब्ध
नवीन मोबाईल बरोबर हमखास भेटवस्तू🎁
त्वरा करा लवकर भेट द्या आणि आपल्या जुन्या फोन ची किंमत जाणून घ्या✔️
आपलं हक्काचं दुकान😊
आमचा पत्ता✍️:
29 मोरया मोबाईल्स,शंखेश्वर आर्क्रेड, आठवडा बाजार ,रत्नागिरी
9272682666
9422392425

What's your reaction?

Related Posts

1 of 291

Leave A Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

error: Content is protected !!