श्रीमती मुक्ता अनंता कातकरी यांना आम आदमी पार्टीचा पाठिंबा
उरण : तालुक्यातील श्रीमती मुक्ता अनंता कातकरी ह्या आदिवासी महिलेचे दिवंगत आजोबा गोपाळ लहाण्या कातकरी यांच्या सात बारा सदरी नावे असलेली पाच एकर जागेवर वारस म्हणून घरत आडनावाच्या आगरी समजातील व्यक्तींची नावे दाखल झाल्याचे अजब प्रकरण उघडकीस आले आहे. वस्तुतः कातकरी आड नावाच्या व्यक्तीची जमीन वारसा हक्काने घरत आड नाव असलेल्या व्यक्तींची कशी होवू शकते, हा साधा प्रश्न आहे. परंतु उरण तालुक्यातील तत्कालीन महसूल अधिकाऱ्यांनी काही समाज कंटकांना हाताशी धरुन ही किमया केलेली आहे. त्यापुढे सात बारा सदरी नोंद असलेले कातकरी हे नाव खाडा खोड करून कासकरी करण्यात आले असल्याचे स्पष्ट झाले आहे. ज्याने करून सदरहू जमीन ही कोणीतरी कासकरी ह्या आडनाव असलेल्या बिगर आदिवासी व्यक्तीची आहे असे भासवण्याचा कुटीर प्रयत्न होता. सदरहू घरत कुटुंबीयांनी ही पाच एकर जमीन एका धनाढ्य व्यक्तीला विकलेली आहे. तत्कालीन महसूल अधिकाऱ्यांच्या हेरा फेरी विरोधात गोपाळ लाहण्या कातकरी यांचे वारस मधुकर कातकरी यांनी उरण न्यायालयात केस दाखल केलेली असून ती न्याय प्रविष्ठ असूनही साल 2019 मध्ये तत्कालीन तहसीलदार यांनी सदरहू जमीन अकृषित करण्याचे आदेश दिले आहेत.

▶️100 पेक्षा जास्त ऑपरेशन दुर्बिणीद्वारे यशस्वी..
▶️ऑपरेशनमुळे पेशंट पूर्णपणे रोगमुक्त..
▶️कोणताही त्रास न होता पेशंट लगेच फिरू लागल्याने अत्यंत समाधानी..
▶️ 70 वर्षे वयाच्या वृद्ध आजीचे तोंडाच्या कर्करोगाचे ऑपरेशन होऊन रोगमुक्त झाल्या व आनंदी आयुष्य जगत आहेत.
▶️8 वर्ष मूल नसलेल्या जोडप्याला Ovarian drilling व पुढील उपचारामुळे आपत्यप्राप्ती झाली.
▶️हर्नियाच्या अनेक पेशंटना कोणत्याही चिरफाड न करता दुर्बिणीद्वारे ऑपरेशन करून खुप फायदा झाला ते समाधानी आहेत.
▶️काही हर्नियाच्या पेशंटचे 3-3 वेळ ऑपरेशन होऊन परत त्रास होऊ लागल्याने दुर्बिणीने ऑपरेशनमुळे व्याधीमुक्त झाले
▶️ गर्भाशयाचा कॅन्सर, ट्युमर यासाठी देखील अनेक शस्त्रक्रिया होऊन पेशंट व्याधीमुक्त झाले.
▶️ बीजकोषाचे ट्युमर सिस्ट यावर उपचार.
▶️ पित्ताशय पित्त खडे दुर्बिणीद्वारे शस्त्रक्रिया दुसऱ्या दिवशी घरी.
▶️ अवघड अपेंडिक्सच्या शस्त्रक्रिया व इतर अनेक स्तानांचा कर्करोग, आतड्यांचा कर्करोग, अन्ननलिकेचा कर्करोग यावर उपचार शस्त्रक्रिया
▶️ रुग्णांना मोफत सल्ला.
▶️ डॉ. मिहीर चितळे.
चितळे नर्सिंग होम. टिळक आळी रत्नागिरी.
संपर्क : 7263096801.
सदरहू प्रकरण उरण येथील आम आदमी पार्टीचे तालुका अध्यक्ष संतोष भगत व पार्टीचे जिल्हा सदस्य व आदिवासी समाजातील लोकांसाठी कार्येरत असलेले उरण सामाजिक संस्थेचे उपाध्यक्ष प्रा राजेंद्र मढवी यांच्या कडे आल्यानंतर त्यांनी आदिवासी कुटुंबाला न्याय मिळवून देण्यासाठी कोंकण विभागीय आयुक्त, जिल्हाधिकारी रायगड या वरिष्ठ स्तरावर पत्रव्यवहार केला आणि त्याचा योग्य पाठपुरावा केला. त्यास अनुसरून तहसीलदार उरण यांनी संपूर्ण चौकशी करून वस्तुनिष्ठ अहवाल उप विभागीय अधिकारी पनवेल यांना पाठविला असून त्यात स्पष्ट म्हटले आहे की वारस नोंद चुकीची झाली असून सदरहू फेर फार क्रमांक 1281 रद्द करण्यात यावा आणि संबंधित इतर फेर फार रद्द करण्यात यावेत. परंतु उप विभागीय अधिकारी पनवेल यांनी तहसीलदार उरण यांच्या अहवालाची दखल न घेता सदरहू प्रकरण स्थगित कसे होईल असे प्रयत्न केल्याचे संकेत मिळत आहेत. म्हणून सदरहू प्रकरण उप विभागीय अधिकारी यांच्या कडून थेट महसूल मंत्री न्यायालयात गेले आहे. मा. महसूल मंत्री यांनी आदिवासी महिलेची सुनावणीस संधी न देताच स्थगिती चा एकतर्फी निर्णय दिलेला आहे. त्यामुळे महसूल मंत्री यांच्या भूमिकाकडे देखील अन्याय झाल्याच्या दृष्टीने पहिले जात आहे. महसूल मंत्री आणि महसूल अधिकारी यांच्या या अन्याया विरोधात मुक्ता अनंता कातकरी हीने प्रांत कार्यालय पनवेल समोर प्रजासत्ताक दिनी आमरण उपोषणाला सुरुवात केली आहे.
