बातम्या

ग्रामीण भागातील समस्यांची जाण आणि समाजाप्रती भान असणारी तरुण पिढी घडवणे हे गाव विकास समितीचे ध्येय- सुहास खंडागळे.

उक्षी बनाची वाडी जिप शाळेला गाव विकास समितीच्या माध्यमातून स्वतंत्र पाणी योजनेचे लोकार्पण..

रत्नागिरी:- ग्रामीण भागातील समस्यांची जाण आणि समाजाप्रती भान असणारी तरुण पिढी घडवणे हे गाव विकास समितीचे ध्येय असल्याचे सांगत कोकणातील ग्रामीण शाळांचा शैक्षणिक दर्जा सुधारायला हवा,त्यासाठी शासनाने प्रयत्न करायला हवेत अशी ठाम भूमिका गाव विकास समितीचे संघटन प्रमुख सुहास खंडागळे यांनी उक्षी बनाची वाडी येथे कार्यक्रमात बोलताना व्यक्त केली.
गाव विकास समिती रत्नागिरी जिल्हा संघटनेच्या माध्यमातून उक्षी बनाची वाडी जिल्हा परिषद शाळेला स्वतंत्र पाणी योजना उपलब्ध करून देण्यात आली असून या योजनेच्या माध्यमातून शाळा परिसरात बगीचा व भाजीपाला उपक्रम राबविण्याचा शाळा व्यवस्थापनाचा उद्देश आहे. या चांगल्या उद्देशाला सहकार्य म्हणून गाव विकास समितीने स्वखर्चाने शाळेजवळच असणाऱ्या तळीतून शाळे साठी स्वतंत्र पाणी योजना उपलब्ध करून दिली आहे. या योजनेचे उदघाटन गाव विकास समितीचे संघटन प्रमुख सुहास खंडागळे यांच्या हस्ते प्रजासत्ताक दिनी पार पडले.यावेळी विद्यार्थ्यांचे सांस्कृतिक कार्यक्रम देखील आयोजित करण्यात आले होते.

जाहिरात..

याप्रसंगी गावातील पालक वर्ग मोठ्या संख्येने उपस्थित होता. यावेळी कार्यक्रमाला प्रमुख पाहुणे म्हणून सुहास खंडागळे उपस्थित होते. यावेळी बोलताना सुहास खंडागळे म्हणाले की ग्रामीण भागातील शाळांचा शैक्षणिक दर्जा सुधारण्यासाठी शासनाने विशेष प्रयत्न करायला हवेत. जिल्हा परिषदेच्या शाळा या सेमी इंग्रजी माध्यमाच्या करायला हव्यात. स्पर्धेच्या युगात ग्रामीण भागातील विद्यार्थी टिकण्यासाठी बदलत्या काळानुसार शैक्षणिक धोरण बदलायला हवे.तशा पद्धतीचे प्रशिक्षण जिल्हा परिषद शाळातील शिक्षकांना द्यायला हवं.यासाठी गाव विकास समिती पाठपुरावा करत असून ग्रामीण भागातून रोजगारासाठीच स्थलांतर थांबवायचं असेल तर या ठिकाणी आज शाळांमधून शिकणाऱ्या विद्यार्थ्यांसाठी भविष्यात याच ठिकाणी रोजगार व्यवसाय उपलब्ध होण्याच्या दृष्टीने प्रयत्न व उपायोजना व्हायला हवेत अशी भूमिका सुहास खंडागळे यांनी यावेळी मांडली.चित्रपटात एक हिरो दहा जणांना मारण्यासाठी येतो आणि लोकांचा बचाव करतो,पण प्रत्यक्षात असे होत नाही.अशा चित्रपटातून आपली मानसिकता तयार केली जाते की कोणीतरी मसीहा आपले प्रश्न सोडवण्यासाठी येईल.आपले प्रश्न सोडविण्यासाठी कोणीही मसीहा येणार नसून ते प्रश्न आपल्यालाच सोडवावे लागणार आहेत.शिक्षण घेतल्या नंतर करिअर अनेकजण करतात,पण यातून ग्रामीण समस्यांबाबत जाण आणि समाजाप्रती सामाजिक बांधीलकीची भूमिका कितीजण मांडतात,समाजाच्या समस्या सोडविण्यासाठी कितीजण पुढाकार घेतात हा प्रश्न आहे.समाजाप्रती सामाजिक भान असणारा तरुण घडविणे हे गाव विकास समितीचे ध्येय असल्याचे सुहास खंडागळे यावेळी म्हणाले. याप्रसंगी गाव विकास समितीचे रत्नागिरी जिल्हा उपाध्यक्ष मुझमील काझी, महिला अध्यक्ष दीक्षा खंडागळे, जिल्हा संघटक मनोज घुग, नितीन गोताड, शाळा व्यवस्थापन समितीचे अध्यक्ष हरीचंद्र बंडबे, उपाध्यक्षा अंकिता रावनंग,ग्रामपंचायत उक्षी उपसरपंच मंगेश नागवेकर, मुख्याध्यापक श्री.भितळे सर, शिक्षक व शिक्षकेतर कर्मचारी,सर्व वाडीप्रमुख,गावकर व पालक वर्ग मोठ्या संख्येने उपस्थित होते.

जाहिरात…

What's your reaction?

Related Posts

1 of 297

Leave A Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

error: Content is protected !!