रत्नागिरी : सर्वत्र दिवाळीची धामधूम पाहायला मिळत आहे. दिवाळी सण साजरा करण्यामध्ये सर्व रमून गेले आहेत. सर्वत्र आनंदाचे वातावरण आहे. रत्नागिरी शहरामध्ये अनेक भागात फटाके वाजवल्यामुळे खूप कचरा जमा झाला आहे. यासाठी सणासुदीच्या दिवसात देखील रत्नागिरी नगर परिषदेचे स्वच्छता कर्मचारी मात्र हा कचरा जमा करण्यासाठी दिवसभर मेहनत घेत आहेत.

याच सामाजिक जाणीवेतून प्रभाग क्रमांक 14 मध्ये श्री दादा ढेकणे व सौ वर्षा ढेकणे यांच्या तर्फे वॉर्ड मधील घंटा गाडी कामगार व सफाई कामगार यांना दिवाळी निमित्त दिवाळी फराळ व गिफ्ट वाटप करण्यात आले. स्वच्छता कर्मचारी यांची मेहनत, काम याची दखल नक्कीच घेण्यासारखी आहे. असे मत भाजपा ओबीसी युवाअध्यक्ष दादा ढेकणे यांनी याप्रसंगी व्यक्त केले. यावेळी रत्नागिरी नगर परिषदेचे स्वच्छता कर्मचारी, प्रभागातील जेष्ठ नागरिक व भारतीय जनता पार्टीचे दादा ढेकणे, सामाजिक कार्यकर्त्या वर्षाताई ढेकणे आदी उपस्थित होते.
दखल न्यूज महाराष्ट्र.