राजकीय

ठाकरे गटाची अडीच लाख प्रतिज्ञापत्र निवडणूक आयोगाने का ठरवण्यात आली बाद..?
ठाकरे गटाला धक्का!

मुंबई : महाराष्ट्रातील सत्तांतरणानंतर शिवसेना कोणाची हा प्रश्न निर्माण झाला दोन्ही गटाने शिवसेना आमची असा दावा केला. त्यामुळे दोन्ही गटांना प्रतिज्ञापत्र सादर करण्याचे आवाहन निवडणूक आयोगाने केले होते.आज ठाकरे गटाला मोठा धक्का बसला आहे. ठाकरे गटाने निवडणूक आयोगाकडे सादर केलेल्या प्रतिज्ञापत्रांपैकी सुमारे अडीच लाख प्रतिज्ञापत्र निवडणूक आयोगाने बाद ठरवली आहेत. प्रतिज्ञापत्राचा फॉरमॅट चुकल्यानं निवडणूक आयोगानं ठाकरे गटाची अडीच लाख प्रतिज्ञापत्र बाद ठरवली आहेत. निवडणूक आयोगाने ठरवून दिलेल्या विहीत नमुण्यामध्येच ही प्रतिज्ञापत्र सादर करणे आवश्यक होते. मात्र शिवसेनेच्या काही पदाधिकाऱ्यांकडून विहीत नमुन्यामध्ये प्रतिज्ञापत्र सादर न करण्यात आल्यानं ही प्रतिज्ञापत्र बाद ठरवण्यात आली आहेत.
आता दोन्ही गटाकडून शिवसेना ही आमचीच आहे हे सिद्ध करण्यासाठी निवडणूक आयोगाकडे प्रतिज्ञापत्र सदार करण्यात येत आहेत. याच पार्श्वभूमीवर ठाकरे गटाकडून दोन ट्रकभरून प्रतिज्ञापत्र निवडणूक आयोगाकडे सादर करण्यात आले होते. 11 लाख प्रतिज्ञापत्र निवडणूक आयोगाकडे सादर करण्यात आले होते. मात्र यातील अडीच लाख प्रतिज्ञापत्र फॉरमॅट चुकल्यानं निवडणूक आयोगाकडून बाद ठरवण्यात आली आहेत. तर उर्वरीत साडेआठ लाख प्रतिज्ञापत्र ही वैध आहेत. निवडणूक आयोगाच्या या निर्णयाचा ठाकरे गटाला मोठा फटका बसण्याची शक्यता आहे.
दखल न्यूज महाराष्ट्र.

जाहिरात..

What's your reaction?

Related Posts

1 of 291

Leave A Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

error: Content is protected !!